
C/Fa OR W/L Meaning : रेल्वे प्रवासाची तऱ्हाच न्यारी आहे. एका खास सुरात आपला प्रवास सुरु होतो. बाहेरील दृश्य पाहताना वेगानं मागं पडणारी झाडं, शेती, गावं, शहर पाहता पाहता डोळ्यांना काही साईन बोर्ड, चिन्हांकित पाट्या नजरेस पडतात. तेव्हा त्याचा अर्थबोध होत नाही. आपल्याला वाटतं हा संकेत रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी असेल. त्याचा आपल्याशी काय संबंध. पण पिवळ्या पाटीवरील काळी अक्षरं आपलं कुतुहल जागवतात. सी/फा अथवा इतर अक्षरांचा अर्थ काय होतो, हे तुम्हाला माहिती आहे क?
रेल्वे स्थानकावर गेल्याव प्रवाशांना कोचबद्दल माहिती नसेत. तेव्हा रेल्वे कोचवर S1, A1 अथवा B2 लिहिलेले असते. त्यावरून नेमकं कोणत्या डब्यात आपली आसन व्यवस्था आहे याचा अंदाज आपण लगेच घेतो आणि धावत त्या डब्यात आपली सीट शोधतो. पण रेल्वे ट्रॅकवरील काही फलक दुर्बोध असतात. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला C/Fa अथवा W/L अशी अक्षरं लिहिलेल्या पिवळ्या पाट्या आपलं लक्ष वेधून घेतात. त्याचा अर्थ काय, ते जाणून घेऊयात.
रेल्वे ट्रॅकजवळील C/Fa चिन्हाचा संबंध काय?
ही अक्षरं पिवळ्या रंगाच्या फलकावर काळ्या अक्षरात लिहिण्यात येतात. ती दुरूनही ठळकपणे दिसतात.
ही चिन्हं सुरक्षेसाठी लावण्यात येतात. प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी ती अंकित करण्यात येतात.
हे चिन्ह पाहिल्यावर ड्रायव्हरने हॉर्न वाजवावा असा नियम आहे.
रेल्वे चालकासाठी हा एक अलर्ट आहे. हे चिन्ह पाहिल्यानंतर ड्रायव्हर हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतो.
रेल्वे क्रॉसिंगच्या अगोदर हे चिन्हं दिसते. त्यासाठी हॉर्न वाजवण्यात येतो.
रेल्वे क्रॉसिंग पॉईंटपासून अंदाजे 250-600 मीटर अंतरावर अगोदर हा साईन बोर्ड असतो.
त्यामुळे ड्रायव्हरला क्रॉसिंग पॉईंट जवळ आल्याचे समजते.
ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच आश्चर्याचा धक्का देणारी आहे.
C/Fa चा अर्थ काय?
तर यातील C म्हणजे शिट्टी आणि Fa म्हणजे गेट असा अर्थ होतो. ही पिवळी पाटी रात्रीच्या अंधारातही दुरूनच चमकते. त्यावर प्रकाश पडल्यावर ती उजळून निघते.
W/L म्हणजे व्हिसलर लिमिट, तर हे C/Fa चे इंग्रजी रूप आहे.
दुसरीकडे W/L म्हणजे प्रतिक्षा यादी असाही अर्थ होतो.
W/L चिन्ह क्रॉसिंग पॉईंट्सवर लोकांना सावध करण्यासाठी शिट्टी वाजवावी असे सूचीत करते. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. नागरी वस्तीजवळ अथवा क्रॉसिंग पॉईंटवर ही सावधगिरी बाळगणे आवश्यक असते.