GK : विमानाची इंधन टाकी फुल्ल करायची असेल तर किती खर्च येतो? एकावेळी किती फ्यूल बसतं?
सध्या देशात काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत आहे. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन अनेक जण आपल्या कारची किंवा बाईकची टाकी फूल्ल करत आहेत. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की विमानाची टाकी फुल्ल करण्यासाठी एका वेळी किती इंधनाची आवश्यकता असते?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेतून येणारं कच्चं तेल ठप्प झाल्यानं जगभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. केवळ पेट्रोल, डिझेलचेच दर वाढले नाहीत तर विमानामध्ये ज्या इंधनाचा वापर होतो, ते एविएशन टर्बाइन फ्यूल अर्थात (ATF) च्या किमती देखील दुपटीने वाढल्या आहेत. दिल्लीमध्ये एटीएफचे दर हे 2.07 लाख प्रति किलोलीटरवर पोहोचले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत हे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत. मात्र जरी एटीएफचे दर वाढले असले तरी देखील भारत सरकारने देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमांसाठी एटीएफचे दर नियंत्रणात ठेवले आहेत, त्यामध्ये केवळ 25 टक्के एवढीच वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये एटीएफचा दर 96,638 रुपये प्रति किलोलीटरवरून 2,07,341 प्रति किलोलीटरवर पोहोचला आहे. मात्र सरकारने देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमानांचे दर नियंत्रणात ठेवल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील इंधनाचा पुरवठा प्रभावीत झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.तर काही देशांमध्ये इंधनाचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल -डिझेलचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन अनेक जण तर आपल्या कार किंवा बाईकची टाकी इंधनाने फुल्ल करत आहेत. एकाचवेळी हजारो रुपयांचं पेट्रोल, डिझेल विकत घेत आहे. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की समजा जर विमानाची टाकी फुल्ल करायची असेल तर किती इंधनाची आवश्यकता असते? आणि त्यासाठी किती खर्च येतो?
जर आपण कमी किवां मध्यम स्वरुपाचं अंतर कापणारे विमान बोइंग 737 किंवा एयरबस A320 या विमानाचा विचार केला तर या विमानात एकाचवेळी 23,000 ते 27,000 लीटर जेट फ्यूल बसू शकतं. या विमांनाची टाकी जर फुल्ल करायची असेल तर एकाचवेळी 27 हजार लीटर एवढ्या जेट फ्यूलची गरज आहे. तर जे लाब पल्ल्यांची विमान असतात, त्यांच्या टाकीची क्षमता ही प्रचंड असते, अशा विमानाची जर टाकी फुल्ल करायची असेल तर कमीत कमी त्यासाठी 3,20,000 लीटर एवढ्या जेट फुल्यची गरज असते.