Temperature Rise : भारतात महाप्रलयाचं संकट, बद्रीनाथ थेट पाण्याखाली…चिंता वाढवणारा रिपोर्ट आला; इशारा काय?

सध्या ध्रुवीय प्रदेशांची तपमानवाढ ही 1.4 अंश सेल्सिअसवर आहे. आता थोडी जरी तापमानवाढ झाली हिमनद्या वेगाने वितळायला लागतील. त्यानंतर बघता बघता अर्ध्या हिमनद्या गायब होतील. तसेच समुद्राची पाणीपातळी वाढेल, असा इशारा देण्यात आलाय.

Temperature Rise : भारतात महाप्रलयाचं संकट, बद्रीनाथ थेट पाण्याखाली...चिंता वाढवणारा रिपोर्ट आला; इशारा काय?
temperature rise in india and global warming
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 5:42 PM

Climate Change Affect On India : वाढतं औद्योगिकीकरण, वृक्षतोड यामुळे पर्यावरणात मोठा बदल होतोय. यामुळे पृथ्वीवरचं तापमानही वाढतंय. याच हवामान आणि पर्यावरण बदलाविषयी चिंता वाढवणारा अंदाज समोर आलाय. या नव्या अंदाजात भारतालाही महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. अशीच तापमानवाढ चालू राहिली तर भारतातील हिमनद्या वितळतील आणि मोठा जलप्रयल येईल, असा चिंता वाढवणारा इशारा देण्यात आलाय. विशेष म्हणजे या रिपोर्टपमध्ये समुद्राची पाणीपातळी वाढलेली आहे. कार्बनचे उत्सर्जन थांबवले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्राची पाणीपातळी तब्बल 9 मिटरने वाढणार

तुर्कीमध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची 31 वी परिषद होणार आहे. ही परिषद होण्याआधी इंटरनॅशनल क्रिस्टोफर क्लायमेट इनिशिएटीव्ह आणि युनायटेड नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम या दोन संस्थांनी मिळून एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार ध्रुवीय प्रदेशाचे तापमान 0.1 टक्क्याने जरी वाढलं तर जगातील अर्ध्या हिमनद्या गायब होतील. या हिमनद्या वितळल्या तर समुद्राची पाणीपातळी तब्बल 9 मिटरने वाढेल. ही पाणीपातळी वाढली तर अर्धी जमीन जलमय होईल.

Loading...

…तर गंगा नदीत महाप्रयल येणार

याच रिपोर्टमध्ये भारतातील हिमनद्यांविषयीही महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. बद्रीनाथमधील हिमनद्यांत भेगा पडत आहेत. त्यामुळे बर्फ तुटण्याची भीती आहे. ही भीती सत्यात उतरली तर बद्रीनाथमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. अलकनंदा तसेच गंगा नदीमध्ये मोठा प्रलय येऊ शकतो, असे संकेतही या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.

समुद्राची पाणीतपाळी 27 सेंटीमिटरने वाढली

सध्या ध्रुवीय प्रदेशांची तपमानवाढ ही 1.4 अंश सेल्सिअसवर आहे. आता थोडी जरी तापमानवाढ झाली हिमनद्या वेगाने वितळायला लागतील. त्यानंतर बघता बघता अर्ध्या हिमनद्या गायब होतील. तसेच समुद्राची पाणीपातळी वाढेल. हवामान बदलामुळे हिमनद्यांची स्थिती सतत बदलत आहे. अंटार्कटिकामध्ये समुद्राची पाणीपातळी 27 सेमीने वाढली आहे. ही अशीच पाणीपातळी वाढत राहिली तर मानवी जीवनही संकटात सापडू शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्यावी. तापमान बदलाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us