नोकर भरतीसाठी त्या महिलेला पैसे द्यावे लागतात?, काँग्रेसचा आरोप?; गोव्यातील राजकारण तापलं

गोव्यातील नोकर भरतीत पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप काँग्रेस खासदाराने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या विरोधात काँग्रेस खासदाराने स्थानिक नागरिकांनासोबत घेऊन निदर्शनेही केली आहेत.

नोकर भरतीसाठी त्या महिलेला पैसे द्यावे लागतात?, काँग्रेसचा आरोप?; गोव्यातील राजकारण तापलं
Captain Viriato
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2024 | 8:55 PM

गोव्यातील नोकरी भरतीच्या प्रक्रियेवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. विशेष करून सॅनक्वेलिम येथील एका महिलेवर त्यांनी निशाणा साधला आहे. या महिलेवर नोकरीच्या पोस्टिंगसाठी वारंवार लाच घेतल्याचा आरोप आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ खासदार फर्नांडिस यांनी अंजुना येथे कँडल मार्च काढला होता. या कँडल मार्चमधील असंख्य लोक उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार हल्ला चढवला.

नोकर भरतीसाठी साखळीत कोणत्या महिलेला पैसे द्यावे लागतात ते सर्व गोव्याला ठाऊक आहे. त्यामुळेच पोलिसांना कारवाईचे आदेश देण्याचे नैतिक धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे नाही. कारण पोलिसांची पदे भरण्यासाठी किती पैसे घेतले जातात हे सर्वांना माहीत आहे. साखळीत जाऊन कोणत्या महिलेला पैसे द्यावे लागतात हे सर्व गोव्याला ठाऊक आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. आम्ही त्याविरोधात लढणार आहोत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला आहे.

पोलिसांकडून परवानग्या

गोव्यात अंजुना आणि वागाटोर भागात मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस पब्जना परवानगी देत आहेत. त्यामुळे या भागातील आवाजाचं प्रदूषण वाढलं आहे. परिणामी रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदाराने हा मुद्दा हाती घेतला असून थेट गोव्यातील पोलीस भरतीच्या प्रक्रियेवरूनच सरकारला धारेवर धरलं आहे.

पुरावे देऊनही कारवाई नाही

सॅन्किलममधील एका महिलेवर गोव्यातील नोकरीच्या नियुक्तीवरून वारंवार आरोप करण्यात आले आहेत. अनेक महिला आणि तरुण या महिलेचे शिकार झाले आहेत. त्यांनी वारंवार या महिलेची तक्रारही केली आहे. तिच्याबाबतचे पुरावेही दिले आहेत. पण मुख्यमंत्र्यांकडून कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तरी आपलं संरक्षण केलं जाईल का याची भीती या नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. फर्नांडिस यांनी या मुद्द्याला हात घालून राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जोरदार निदर्शनेही करण्यात आली.