हा म्हावरा नव्हे, काळं सोनं… दीड किलोचा मासा 18 हजाराला विकला; अशी काय आहे खासियत?

गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दोनदा पूर होता. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी यावेळी मच्छिमारांना पुलासा प्रजातीचे मासे खूपच कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे या माशांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

हा म्हावरा नव्हे, काळं सोनं... दीड किलोचा मासा 18 हजाराला विकला; अशी काय आहे खासियत?
pulasa-fish-godavari
| Updated on: Aug 06, 2025 | 10:24 PM

आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात दोनदा पूर होता. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी यावेळी मच्छिमारांना पुलासा प्रजातीचे मासे खूपच कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे मच्छिमार रिकाम्या हाताने परतत आहेत. पुलासा प्रजातीच्या माशांची संख्या सतत कमी होत आहे, त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभाग आणि सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. पुलासा माशांची संख्या कमी असल्याने याला सोन्याचा भाव मिळत आहे.

अलिकडेच झालेल्या लिलावात दीड किलोच्या पुलासाचा माशाला 18000 रुपयांचा भाव मिळाला आहे. पुलासा माशाला आता काळं सोनं म्हटलं जात आहे. हा मासा दुर्मिळ असल्याने त्याची किंमत गगनाला भिडली आहे. यंदा गोदावरी नदीत मच्छिमारांना ताजे पुलासा मासे खूप कमी प्रमाणात मिळत आहे. जरी हा मासा सापडला तरी त्याचे वजन हे वजन एक किलोपेक्षा कमी असते. त्यामुळे कमी प्रमाणात सापडणाऱ्या या माशांची मागणी खूप वाढली आहे. पुलासा मासा खरेदी करण्यासाठी अनेक लोक मच्छिमारांकडे आधीच ऑर्डर देत असल्याचेही समोर आले आहे.

पुलासा माशाला लिलावात 18 हजारांचा भाव

यानम बंदरात पुलासा माशांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. यावेळी लिलावात एक ते दीड किलो वजनाचा पुलास मासा 18 हजार रुपयांपर्यंत विकला गेला. या माशाची चव खूप खास आहे. मात्र त्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याची मागणी आणि किंमत वाढली आहे. ज्या लोकाना पुलासा मासा आवडतो ते कोणत्याही किमतीत हा मासा खरेदी करण्यात तयार असतात. समुद्रात राहणारे हे पुलासा मासे पावसाळ्यात प्रजननासाठी गोदावरीच्या गोड्या पाण्यात प्रवेश करतात. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे.

माशांचे प्रमाण घटले

पुलासा ही समुद्रात आढळणारी माशांची एक विशेष प्रजाती आहे. हे मासे दरवर्षी पावसाळ्यात प्रजननासाठी गोड्या पाण्यातील गोदावरी नदीत येत असतात. हे मासे शेकडो किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात आणि पुराच्या लाल पाण्यात प्रवेश करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात जैविक बदल होतो. याच बदलामुळे त्यांना विशिष्ट चव मिळते. मात्र दरवर्षी या माशांच्या प्रमाणात मोठी घट होत आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, जल प्रदूषण आणि अंडी घालण्यापूर्वीच त्यांची शिकार होत असल्यामुळे त्यांची संख्या घटली आहे.