Todays Gold Rate : उच्चांकापेक्षा 55000 रुपयांनी सोने स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..

Todays Gold Rate : इराण आणि अमेरिका युद्धादरम्यान सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढउतार बघायला मिळत आहे. आजही सोने त्याच्या उच्चांकापेक्षा स्वस्त असल्याचे बघायला मिळत आहे. चला तर जाणून घ्या आजचा सोने आणि चांदीचा भाव.

Todays Gold Rate : उच्चांकापेक्षा 55000 रुपयांनी सोने स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..
Gold and silver todyas rates
| Updated on: Mar 29, 2026 | 12:58 PM

अमेरिका आणि इराण युद्धात सोने आणि चांदीच्या दरात सतत चढउतार बघायला मिळत आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर सोने चांदीचे भाव कमी झाले. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्यासोबतच चांदीने झेप घेतली. आता नुकताच आज 29 मार्च 2026 चे सोने आणि चांदीचे भाव पुढे आली आहेत. सोने आणि चांदीचे त्यांच्या उच्चांकापेक्षा भाव कमीच राहिलेत. सोने अजूनही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 55,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त आहे. 1 किलो चांदीचा भाव 2.11 लाख रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाला आहे. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू होण्यापूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगणाला पोहोचले होते. या युद्धानंतर उच्चांकापेक्षा भाव कमी झाले. असूनही सोन्याचा भाव त्याच्या उच्चांकापेक्षा 55,000 रुपयांनी स्वस्तच आहे. मागील उच्चांकी दर चांदीचे बघता सध्याच्या परिस्थितीला चांदीचे भाव घसरले आहेत. MCX वर चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 4,39,337 रुपये प्रति किलो आहे. पण सध्याच्या घडीला चांदीचा भाव हा प्रति किलो 2,11,587 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सोन्याचा उच्चांक पाहिला तर तो प्रति 10 ग्रॅम 2,02,984 रुपये आहे आणि आता सोने प्रति 10 ग्रॅम 55, 714 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज 24 कॅरेटचा भाव 1,42,942 रुपये/10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा सोन्याचा भाव 1,39,510 रुपये/10 ग्रॅम आहे. 20 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,220 रुपये/10 ग्रॅम आहे. उच्चांकानुसार, आजही सोने स्वस्त असल्याचे बघायला मिळत आहे.

मागील काही महिन्यात सतत सोन्याचे भाव वधारताना दिसले. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे भाव कमी झाले. त्याच्या उच्चांकानुसार, आजही सोन्याचा भाव तसा कमी आहे. गेल्याच आठवड्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 28 हजारांपर्यंत घसरला होता. आता पुन्हा एकदा सोन्याचा भावाने स्पिड पकडल्याचे बघायला मिळत आहे.

6 एप्रिलपर्यंत अमेरिकेने इराणवर युद्धबंदीची घोषणा केली. त्यामुळे सोन्याच्या भावाच्या किमती मार्केटमध्ये स्थिर राहण्याचा अंदाज होता. पण सोने आणि चांदीच्या भावात सतत चढउतार बघायला मिळत आहे. जर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबले तर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यांच्या उच्चांकाच्या आसपास भाव जाण्याचा अंदाज आहे.

Follow Us