AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आली गुडन्यूज, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफचा पहिला परिणाम समोर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याचा पहिला परिणाम समोर आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी गुडन्यूज आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी आली गुडन्यूज, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, टॅरिफचा पहिला परिणाम समोर
| Updated on: Aug 11, 2025 | 8:20 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी हे डोनाल्ड ट्रम्प यांचं दबावतंत्र असल्याचं बोललं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तुंवर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, म्हणून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्यात आला. अमेरिकेकडून भारतावर लावण्यात आलेल्या अतिरिक्त टॅरिफची अंमलबजावणी येत्या 28 ऑगस्टपासून होणार आहे. याचाच अर्थ 28 ऑगस्टपासून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावणार जाणार आहे. इकनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्टसनुसार 2024 मध्ये अमेरिकेनं भारताकडून तब्बल 87 अब्ज डॉलर रुपयांच्या वस्तुंची आयात केली होती.

ट्रम्प यांच्या धमकीचा परिणाम होणार नाही

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ट्रम्प यांच्या या धमकीला जागतिक बाजारपेठेत फार गांभीर्यानं घेतलं गेलेलं नाहीये. आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला असा विश्वास आहे की, ट्रम्प यांनी भारतावर जो 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, याचा फार मोठा परिणाम हा भारतावर होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत ट्रम्प यांचं हे रेकॉर्ड राहिलं आहे की ते आपल्या निर्णयावरून लगेचच पलटी देखील मारतात, त्यामुळे ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ लावण्याचा निर्णय अंतिम आहे, असं म्हणणं घाईचं ठरेल असं मत आतंरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादीमीर पुतिन या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे, त्यापूर्वी रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफचा निर्णय घेतला असावा असं देखील बोललं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी आशियाई बाजारांमध्ये ब्रेंट क्रूड ऑयलची किंमत 65.81 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. हे दर गेल्या दोन महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. तेलाच्या घसरलेल्या या किमतीच हे सांगून जातात की कच्च्या तेलाच्या सप्लाई साखळीवर टॅरिफ धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाहीये, तज्ज्ञांच्या मते भारत पूर्वीप्रमाणेच रशियाकडून तेलाची खरेदी सुरू ठेवेल किंवा गरज पडली तर इतर कोणत्याही देशाकडून तेल खरेदी केली जाईल. चीन देखील रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो, मात्र ट्रम्प चीनवर असा दबाव निर्माण करू शकत नाही, कारण अमेरिका अनेक गोष्टींसाठी चीनवर अवलंबून आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक