AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST: ‘जीएसटी’चे स्लॅब घटणार? केंद्राची महत्वपूर्ण बैठक, अर्थवर्तुळाच्या नजरा दिल्लीकडे…

गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांच्या वाढीसह जीएसटी संकलनाचा आकडा 1.41 लाख कोटींवर पोहोचला. सामान्य व्यावसायिक ते बडया उद्योगपतींवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तू व सेवा कर संरचनेत (जीएसटी) बदल करण्याच्या मानसिकतेत केंद्र सरकार आहे.

GST: ‘जीएसटी’चे स्लॅब घटणार? केंद्राची  महत्वपूर्ण बैठक, अर्थवर्तुळाच्या नजरा दिल्लीकडे...
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 6:49 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकार वस्तू व सेवा कर संरचनेत (GST) संरचनात्मक बदल करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमूहाची (Minster group meeting) महत्वाची बैठक होणार आहे. येत्या 17 जून रोजी होणाऱ्या बैठकीत जीएसटी करसंचनेविषयीच्या बदलाविषयी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सर्व राज्य सरकारांसह उद्योग जगताच्या नजरा राजधानी दिल्लीतील बैठकीकडे खिळल्या आहेत. मे महिन्यात जीएसटीचे रेकॉर्डब्रेक (GST Collection) संकलन झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांच्या वाढीसह जीएसटी संकलनाचा आकडा 1.41 लाख कोटींवर पोहोचला. सामान्य व्यावसायिक ते बडया उद्योगपतींवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तू व सेवा कर संरचनेत (जीएसटी) बदल करण्याच्या मानसिकतेत केंद्र सरकार आहे. जीएसटीमधील कर टप्पे (टॅक्स स्लॅब), कर संरचनेत बदल आणि राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी भरपाईला (GST COMPANSATION) ब्रेक आदी बाबींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

जीएसटी टॅक्स स्लॅब घट

जीएसटीच्या अंमलबजावणीला पाच वर्षे पूर्ण होत आहे. आजवर जीएसटी कर संरचनेत राज्यांच्या शिफारशीनुसार अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले. सर्वात कळीचा मुद्दा जीएसटी कर टप्प्यांचा आहे. विविध वस्तू व सेवांची वर्गवारी कर टप्प्यांत करण्यात आली आहे. सध्या जीएसटीचे 5 टक्के, 12टक्के, 18टक्के, 28टक्के असे चार कर टप्पे आहेत. केंद्र सरकार जीएसटी कर टप्प्यांत घट करून संख्या चार वरुन तीन करण्याच्या विचाराधीन आहे.

एक देश, एक कर

भारतात वस्तू व सेवा कर 01 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. संपूर्ण देशभरात एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. संपूर्ण देशभरात एकसमान करप्रणाली असावी हा उद्देश जीएसटीच्या अंमलबजावणीच्या मागे होता. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून जीएसटी करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत घटनादुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले.

टप्पे कमी, किंमत जास्त

केंद्र सरकारने कर टप्प्यात घट केल्यास त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. कर टप्पा कमी करुन महसूलात वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सुधारीत रचनेनुसार, सध्या सर्वात कमी कर टप्पा 6 टक्क्यांचा असण्याची शक्यता आहे.

जीएसटीत वाटा शून्य

वस्तू व सेवा कर संरचना लागू केल्यानंतर राज्यांना होणारे थेट नुकसान टाळण्यासाठी नियमांची तरतूद करण्यात आली होती. पहिल्या पाच वर्षात राज्यांना जीएसटी भरपाई अदा केली जाणार होती. त्यानुसार राज्यांना पैसे वर्ग करण्यात येत आहेत. मात्र, येत्या जुलै महिन्यात जीएसटीला पाच वर्षे पूर्ण होत असल्यामुळे सरकारचा जीएसटीतील वाटा शून्य होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचे महसूली उत्पन्न घटणार आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...