जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

श्रीनगर : पुलवामात भारतीय जवानांना निशाणा केल्यानंतर, दहशतवाद्यांनी आता सर्वसामान्य नागरिकांकडे मोर्चा वळवला आहे. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला तर  33 नागरिक जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळच्या स्फोटानंतर संध्याकाळी पाचपर्यंत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. यासिर …

जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

श्रीनगर : पुलवामात भारतीय जवानांना निशाणा केल्यानंतर, दहशतवाद्यांनी आता सर्वसामान्य नागरिकांकडे मोर्चा वळवला आहे. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला तर  33 नागरिक जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळच्या स्फोटानंतर संध्याकाळी पाचपर्यंत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. यासिर अरहान असं या हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. बस स्टॅण्डवर ग्रेनेड फेकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली. सकाळी साडेअकारच्या सुमारास हल्ला झाल्यानंतर अवघ्या 5 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

LIVE UPDATE :

  • ग्रेनेड हल्ल्यात 33 जण जखमी, तर एका नागरिकाचा मृत्यू
  • पोलिसांनी जम्मू बस स्टँडजवळील संपूर्ण परिसर रिकामा केला असून, सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आला आहे.
  • बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
  • सुरक्षा दलाकडून जम्मूच्या परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दिल्लीला जाणाऱ्या बसवर ग्रेनेड हल्ला
  • जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी या ग्रेनेड हल्ल्यासंदर्भात माहिती दिली.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या गाडीवर पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायूसेनेने पाकिस्तानत घुसून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवादी तळावर बॉम्ब टाकला आणि तळ उद्ध्वस्त केले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *