AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न लागलं, सप्तपदी झाल्या, पण पाठवणीवेळी वधूचं ‘ते’ गुपित झालं उघड, चिडलेल्या वराने थेट…

प्रयागराजच्या मौयमा येथे एका मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले, पण पाठवणी असताना वराला वधूबद्दल अशी गोष्ट समजली की तो हैराणच झाला. वधूचं ते गुपिच कळल्याने तो प्रचंड चिडला आणि रागाच्या भरात त्याने थेट..

लग्न लागलं, सप्तपदी झाल्या, पण पाठवणीवेळी वधूचं 'ते' गुपित झालं उघड, चिडलेल्या वराने थेट...
Extramarital Affair
| Updated on: May 26, 2025 | 3:06 PM
Share

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये एक अजब घटना घडली आहे. तिथे एका तरूणीचं लग्न ठरलं. खूप धूमधडाक्यात तिचं वराशी लग्न लागलं, वरमाला घातल्या, सप्तपदी झाल्या. जेवण वगैरे होऊन आता वधूच्या पाठवणीची वेळ आली. सगळ्यांनी तिची भेट घेऊन आशिर्वाददिले. तेव्हा वधू जोर-जोरात रडू लागली. आई-बाबांना सोडून जाताना तिला अश्रू अनावर झाले. मात्र तिचं रडणं ऐकून वर आणि त्याच्या घरचे अगदी हैराण झाले, त्यांनी थेट धोका दिल्याचा, फसवल्याचा आरोप करत लग्नच मोडलं. पण एवढ्या तडकाफडकी निर्णय घ्यायला झालं तरी काय ?

पाठवणीच्यावेळी वराला आणि त्याच्या कुटुंबियांना वधूचं सत्य समजलं की खरंतर वधू ही तोतरं बोलणारी होती. ही घटना प्रयागराजमधील मौयमा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मौईमा येथील एका गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न कौशाम्बी जिल्ह्यातील एका तरुणाशी निश्चित झाले होते. या लग्नाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण होते. वराने मोठ्या थाटामाटात लग्नाची मिरवणूक आणली. तर मुलीकडच्या लोकांनी देखील लग्नाच्या वरातीचे, वराचे आणि त्याच्या घरच्यांचे खूप प्रेमाने स्वागत केले आणि त्यांचे स्वागत केले. यानंतर, वरमाला समारंभ आणि लग्नातील सप्तपदी झाल्या आणि शाही विवाहसोहळा पार पडला.

वधू रडल्यावर उघड झालं ते गुपित

या सगळ्या विधींमध्ये रात्र निघून गेली आणि सकाळी निघण्याची वेळ आली तेव्हा वधू जोरजोरात रडू लागली. त्यावेळी, वराला आणि त्याच्या कुटुंबाला धक्काच बसला, कारण त्यांना तेव्हाच कळलं ही वधू, तरूणी तोतरी आहे. तिचा आवाज, तोतरं बोलणं ऐकून वराला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी ताबडतोब तिथल्या नेत्याला फोन केला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याला सांगितलं. आम्ही हे लग्न मान्य करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यानंतर दोन्ही पक्षांमधील वाद वाढला आणि प्रकरण पंचायतीपर्यंत पोहोचले.

सहमतीने मोडलं लग्न

अखेर दोन्ही बाजूंच्या मान्यवरांनी पंचायतीसमोर एकत्र बसून या विषयावर चर्चा केली. पंचायतीसमोरच दोन्ही पक्षांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आणि शेवटी असा निर्णय झाला की या लग्नानंतरही वधू तिच्या सासरच्या घरात आनंदाने राहू शकणार नाही. तिचा तोतरेपणा हा त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच अडथळा ठरेल. त्यामुळे, अशा परिस्थितीत हे लग्न इथेच संपवले पाहिजे. मग दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने एकमेकांच्या वस्तू परत केल्या. परस्पर संमंतीने ते लग्न तिथेच मोडलं. आणि लग्नाची मिरवणूक वधूशिवायच घरी परत निघाली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.