भाजप म्हणतं, यावेळीही आम्हीच मुसंडी मारणार; सत्तेच्या गणितासाठी ‘हे’ दिग्गज एकाच राज्यात मुक्काम ठोकणार…

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी, भाजपकडून 12 ऑक्टोबरपासून 'गुजरात गौरव यात्रा' सुरू करत आहे. ही यात्रा 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

भाजप म्हणतं, यावेळीही आम्हीच मुसंडी मारणार; सत्तेच्या गणितासाठी हे दिग्गज एकाच राज्यात मुक्काम ठोकणार...
| Updated on: Oct 11, 2022 | 9:07 PM

अहमदाबादः आगामी गुजरात विधानसभा (Gujarat Assembly) निवडणुकीसाठी (Elections 2022) सगळ्याच राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे. त्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तर मास्टर प्लॅन तयारच केला आहे. त्यामुळे आता गुजरातसारख्या राज्यत ज्या भाजपने आपली 27 वर्षे सत्ता गाजवली आहे, त्या भाजपला आम आदमी पक्ष आता कसा टक्कर देतो ते येणारा काळच ठरवणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी, भाजपकडून 12 ऑक्टोबरपासून ‘गुजरात गौरव यात्रा’ सुरू करत आहे.
ही यात्रा 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी 5 ठिकाणाहून गौरव यात्रा निघणार आहे.

तर 12 ऑक्टोबर रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन ठिकाणांहून गौरव यात्रेला प्रारंभ करणार असून तर 13 ऑक्टोबरला गृहमंत्री अमित शाह तीन ठिकाणांहून प्रवासाला आरंभ करत आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन दौऱ्यांपैकी एका दौऱ्याला भगवान बिरसा मुंडा आदिवासी गौरव यात्रा असंही नाव दिलं गेलं आहे.

या 9 दिवसांच्या दौऱ्यामध्ये 9 केंद्रीय मंत्री सामील होणार आहेत. ही भाजपची ही गौरव यात्रा संपूर्ण दिवस चालणार आहे. त्याचबरोबर 12 ऑक्टोबर रोजी रावसाहेब दानवे गुजरात गौरव यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तर 13 ऑक्टोबर रोजी धर्मेंद्र प्रधान 14 ऑक्टोबरला नेते पुरुषोत्तम रुपाला सहभागी होणार आहेत.

15 ऑक्टोबरला रोजी मनसुख मांडविया रुजू होणार असून 16 ऑक्टोबर रोजी संजीव बाल्याण यात्रेत हजेरी लावणार आहेत.

तर 17 रोजी या संपूर्ण प्रवासात हरदीप सिंग सहभागी होणार आहेत. प्रल्हाद जोशी हे 18 ऑक्टोबर रोजी 19 ऑक्टोबरला सर्बानंद सोनोवाल या यात्रेत सामील होणार आहेत. तर शेवटच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबरला राव इंद्रजित सिंग यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

गुजरात गौरव यात्रेची सगळी जबाबदारी ही गुजरातमधील 5 केंद्रीय मंत्र्यांवर असणार आहे. मनसुख मांडविया, दर्शना जरदोश, देवुसिंह चौहान, डॉ. महेंद्र मुंजपारा आणि पुरुषोत्तम रुपाला यांची जबाबदारी असणार आहे.

भाजपची गुजरात गौरव यात्रा 144 विधानसभा मतदारसंघातून 5,734 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत एकूण 145 जाहीर सभा होणार आहेत.

तर पाच यात्रांपैकी पहिल्यांदा ही यात्रा 12 ऑक्टोबरपासून 9 दिवसांत 9 जिल्ह्यांतील 33 विधानसभांच्या ठिकठिकाणी जाणार आहे.

त्यामुळे या यात्रेचा 1730 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. गुजरात गौरव यात्रेअंतर्गत यात्रेचा पहिला दिवस हा बहुचरजी मातेच्या दरबारातून सुरू होणार आहे.

गुजरात गौरव यात्रेतील दुसरा टप्पा हा 13 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून 13 जिल्ह्यांतील 35 विधानसभेतील वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहेत.

त्यामुळे हे आंतर एकूण 990 किमी एवढे होणार आहे. तिसरा टप्पा हा 14 जिल्ह्यांतील 31 विधानसभा मतदारसंघातून एकूण 1068 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अशा प्रकारे 9 जिल्ह्यांतील 24 विधानसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघातून हा प्रवास होणार आहे.

त्यानंतर 20 ऑक्टोबर गुजरात दौरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करणार आहेत. त्यांची ही सभा अहमदाबाद किंवा गांधीनगरमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.