ब्रेकिंगः गुजरात दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा 141 वर, 200 अजूनही बेपत्ता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘हा’ कार्यक्रम रद्द

छटपूजेच्या निमित्ताने या पूलावर 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे अनेक महिला व लहान मुलेदेखील नदीत कोसळले.

ब्रेकिंगः गुजरात दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा 141 वर, 200 अजूनही बेपत्ता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम रद्द
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 31, 2022 | 8:36 AM

अहमदाबादः गुजरातमधील (Gujrat Mishap) मोरबी पूल (Morbi Bridge) दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 141 च्याही पुढे गेला आहे. तर 200 पेक्षा जास्त जण या घटनेत जखमी झाले आहेत. तर 200 जण अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा अहमदाबादमधील रोड शो रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी मृतांच्या नातेवाईकांना तसेच घटनेतील जखमींना भेटायला जाण्याची शक्यता आहे.

रविवारी संध्याकाळी मोरबी शहरातील माच्छू नदीवरील झुलता पूळ अचानक कोसळला. संध्याकाळी साडे सहा वाजता ही दुर्घटना घडली. ब्रिटिशांच्या काळातील हा ब्रीज आहे. पाचच दिवसांपूर्वी नूतनीकरण झालेल्या पूलाचे केबल तुटल्याने ही घटना घडली.

पाहा बचावकार्याची थेट दृश्य-

छटपूजेच्या निमित्ताने या पूलावर 500 ते 600 भाविक उपस्थित होते. अचानक पूल कोसळल्यामुळे अनेक महिला व लहान मुलेदेखील नदीत कोसळले.

अजूनही घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत पंतप्रधानांच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

मात्र मोरबी पूल दुर्घटनेमुळे पंतप्रधान मोदी यांचा गुजरातमधील रोड शो रद्द करण्यात आला आहे. तसेच गांधी नगर येथे प्रस्तावित पेज समिती कार्यक्रमातही बदल करण्यात आला आहे. मंगळवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच 182 मतदार संघातील पेज प्रमुखांना संबोधित करणार होते.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मोरबी येथे भेट देतील. मोरबी शहरात घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम तसेच एअरफोर्स, नेव्हीच्या टीमचे बचावकार्य अखंडपणे सुरु आहे. पंतप्रधान मोदी वेळोवेळी बचावकार्याची माहिती घेत आहेत.