घरभाडं मागू नका, बायको-मुलीवर बलात्कार करा, त्यानं केली अजब सौदेबाजी; कांड समोर येताच सासू हादरली!

सध्या एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलीवर बलात्कार करण्यास घरमालकाला परवानगी दिली आहे. हे प्रकरण समोर येताच खळबळ उडाली आहे.

घरभाडं मागू नका, बायको-मुलीवर बलात्कार करा, त्यानं केली अजब सौदेबाजी; कांड समोर येताच सासू हादरली!
gujarat morbi news
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2026 | 6:54 PM

Gujarat Morbi News : एक पुरुष आपली पत्नी आणि लेक यांच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतो. पत्नी आणि लेक सुरक्षित राहाव्यात, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी तो दिवसरात काबाडकष्ट करत असतो. जीवचं रान करून त्यांच्या पायाशी सुख आणत असतो. परंतु समोर एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहे. एका नराधमाने आपल्याच अल्पयीन मुलीवर आणि पत्नीवर वारंवार बलात्कार करण्याचा सौदा केला आहे. जवळ घराच्या भाड्याचे पैसे नसल्याने त्याने हे कृत्य केलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेली ही घटना गुजरातमधील मोरबी येथील आहे. तेथील एका व्यक्तीने घरमालकासोबत कथितरित्या आपल्या पत्नीचा तसेच अल्पवयीन लेकीचा सौदा केला आहे. म्हणजेच घरभाड्याच्या (किराया) बदल्यात त्याने घरमालकाला पत्नी आणि लेकीवर बलात्कार करण्याची परवानगी दिली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बायके आणि मुलीवर वारंवार बलात्कार करण्याची मुभा

पोलिसांनी सांगितल्यानुसार साधारण सहा महिन्यापूर्वी गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे राहणारे एक कुटुंब कामाच्या शोधात मोरबी येथे गेले होते. तिथे त्यांनी प्रतिमहिना 2000 रुपये याप्रमाणे एक खोली भाड्याने घेतली. परंतु त्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परिणामी सलग चार महिन्यांचे भाडे थकले. हे पैसे चुकते करण्यासाठी मग आरोपीने आपल्या घरमालकासोब सौदेबाजी केली. त्याने घरमालकाला घराचे भाडे देण्याऐवजी बायके आणि मुलीवर वारंवार बलात्कार करण्याची मुभा दिल्याचा दावा केला जातोय.

सासूला सगळं समजताच..

हा प्रकार नंतर आरोपीच्या सासूला समजला. हे सगळं प्रकरण समोर येताच आरोपीच्या सासूने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. परंतु आरोपीने पत्नी आणि मुलीवरच बलात्कार करण्याची परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Follow Us