Success Story: सिगारेट वेस्टमधून 100 कोटींचा व्यवसाय, रोज लाखो सिगारेट बट्स रिसायकल करुन खेळणी अन्…
नमन गुप्ता यांनी 2018 मध्ये या उद्योगाला सुरुवात केली. तेव्हा 20 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी वडिलांकडून घेतली. वडिलांकडून नेहमीच त्यांना प्रोत्साहन मिळत राहिले. मग सिगारेट बट्स रिसायकल करुन कापूस तयार करु लागले. त्या कापसापासून सॉफ्ट टॉय बनवू लागले.

विश्वास ठेवणे अवघड आहे, परंतु सिगारेट बट्समधून कोट्यवधी रुपयांची कमाई होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर अनेक जणांचे ‘नाही’ असे असणार आहे. परंतु तुमची जर वेगळा विचार करण्याची तयारी असेल तर ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असा प्रकार होऊ शकतो. कोट्यवधींची कमाई कचऱ्यात फेकून देणाऱ्या सिगारेट बट्समधून होऊ शकते. नवी दिल्लीतील युवा उद्योजक नमन गुप्ता यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांच्या कंपनीत कचऱ्यात फेकणाऱ्या सिगारेट बट्समधून खेळणी, कपडे आणि पेपर तयार केले जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होत आहे. या उद्योगात त्यांच्यासोबत अडीच हजार कर्मचारी आणि वितरकांची साखळी आहे. कल्पना आली...
