AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंडिया@2047: नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत कसा असेल? अमृतकाळात महत्त्वाचे ठरणारे ‘ते’ पंच प्राण कोणते?

त्या दिवशी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता पंच प्राण यांचा मोठा संकल्प करण्याची वेळ देशावर आली आहे. या पंच प्राण आपल्या जगण्याची गरज असल्याचंही मोदींनी सांगितलं.

इंडिया@2047: नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील भारत कसा असेल? अमृतकाळात महत्त्वाचे ठरणारे 'ते' पंच प्राण कोणते?
Happy Birthday PM Narendra ModiImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 3:02 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे आज 72 वर्षांचे झालेत. ही 21 वर्षे ते सातत्याने जनतेची सेवा करतायत. 2001 ते 2014 अशी 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) होते. गेली 8 वर्षे म्हणजे 2014 पासून ते देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहतायत. आज ते देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.  8 वर्ष सत्तेत असणारे हे पंतप्रधान देशासाठी एक आदर्श आहेत. सार्वभौम, स्वावलंबी, जिथे समतावादी समाज आहे, जिथे स्वदेशीचे वर्चस्व आहे, जिथे लोकांना आपल्या भूतकाळाचा अभिमान आहे, जो मानसिक गुलामगिरीतून मुक्त आहे, जिथे लोक आपल्या हक्क आणि कर्तव्ये या दोन्ही गोष्टींशी सुसंगतपणे चालतात, जिथे समाजात सुसंवाद आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वसुधैव कुटुंबकमच्या भावनेने असलेले राष्ट्र आहे, अशा भारताच्या उभारणीचे त्यांचे स्वप्न आहे.

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याच्या अमृत काळात पुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 सालापर्यंतचा संकल्प सांगितला. जो एकप्रकारचा आराखडाच आहे असं म्हणायला हरकत नाही.

त्या दिवशी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता पंच प्राण यांचा मोठा संकल्प करण्याची वेळ देशावर आली आहे. या पंच प्राण आपल्या जगण्याची गरज असल्याचंही मोदींनी सांगितलं.

हे पंच प्राण कोणते – 1. विकसित भारत 2. गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्तता 3. वारशाचा अभिमान 4. एकता आणि एकजुटता 5. नागरिकांचे कर्तव्य

पंच प्राणांच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यासाठी पंतप्रधानांनी वरील 5 गोष्टींवर भर दिला असला तरी त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख नितांत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, पुढील 25 वर्षांत म्हणजे 2047 सालापर्यंत विकासाचा कळस गाठणे आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी देशातील जनतेचे आशीर्वाद घेणे.

पंतप्रधान मोदी यांना भारताकडे पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून पहायचे आहे. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था गाठणे हे त्यांचे ध्येय नसून, पाश्चिमात्य विकासाच्या सिद्धांताशिवाय ते देशाच्या मानवकेंद्री विकासाच्या बाजूने आहेत. जे सर्वसमावेशक आहे.

देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी 2014 पासून पीएम मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्वनिधी योजना अशा अनेक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या. स्टार्टअप्समधून गेल्या 8 वर्षांत सुमारे 109 युनिकॉर्न कंपन्या तयार झाल्या आहेत.

मजबूत अर्थव्यवस्था आणि विकासाला गती देण्याच्या दिशेने पंतप्रधानांचे विचार लाल किल्ल्यावरील त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतात. आज देशाच्या आकांक्षा आणि अपेक्षा वाढत असून देशातील आकांक्षी समाजाला देश बदलताना आणि डोळ्यासमोरून पुढे जाताना पाहायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी वारंवार नमूद केले आहे.

विकसित राष्ट्र म्हणून पुढे जाण्यासाठी देश उत्साही आणि उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. आपल्याकडे युवाशक्तीची एवढी मोठी फौज आहे, ज्यात आत्मविश्वास निर्माण करून आपण कुशल झालो तर आपण उत्पादकतेचे धनी होऊ शकतो. त्यामुळे तरुण भारत जगापुढे आदर्श निर्माण करण्यास सक्षम आहे, याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे.

कोरोनानंतर पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय खाद्य पदार्थांकडे वाढत असलेला ओढा यामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळणे स्वाभाविक आहे. त्यामुळे जागतिक पटलावरील भविष्यातील मागणीकडे बघताना पंतप्रधान मोदी यांना देशात आणि भारतातील जनतेत विश्वास निर्माण करून देशाची गमावलेली आर्थिक प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करायची आहे.

देशाचे भवितव्य घडविण्यात महत्त्वाची ठरणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धचे युद्ध. भ्रष्टाचाराबाबत शून्य सहिष्णुतेचे धोरण कठोरपणे राबवून पंतप्रधान मोदी यांना भ्रष्टाचार निर्मूलन करायचं आहे. हे समजून घेण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण समजून घ्यावे लागेल.

15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचारावर थेट हल्ला चढवला आणि स्पष्ट आणि कडक इशारा दिला की समाजात दोन सामाजिक विकृती निर्माण झाल्या आहेत, ज्यांचे उच्चाटन करण अत्यंत आवश्यक आहे. एक म्हणजे भ्रष्टाचार आणि दुसरा म्हणजे घराणेशाही.

त्या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून म्हणाले होते की, “आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी लढा द्यावा लागेल. एकीकडे देशात काही लोकांना राहायला जागा नाही, तर दुसरीकडे लोकांना चोरीचा माल ठेवायला जागा नाही, असे लोक आहेत. ”

‘भ्रष्टाचाराविरोधात मला निर्णायक लढाई लढायची आहे. हा लढा अधिक तीव्र करावा लागेल. मला 130 कोटी भारतीयांच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे. अमृतकालमध्ये भ्रष्टाचाराविरोधातील मोहिमेला आणखी वेग येईल, असा हा स्पष्ट संदेश आणि संकेत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या कृत्यांपासून परावृत्त केले नाही तर भ्रष्टाचाराविरोधातील केंद्रीय तपास यंत्रणांची कठोरता वाढेल” असा पंतप्रधान मोदींचा संदेश स्पष्ट आहे.

ईडी, सीबीआय, एसएफआयओ अशा सर्व तपास संस्थांना चुकीच्या पद्धतीने पैसे गोळा करणाऱ्यांविरोधात चौकशी करण्याची मोकळीक असेल, विरोधी पक्षांनी कितीही राजकीय दुरुपयोगाचे आरोप केले तरी भ्रष्ट अधिकारी/नेत्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया थांबणार नाही, असा संदेश आहे.

बंगालमध्ये टीएमसी, दिल्लीत ‘आप’, यूपीत सपा, झारखंडमधील जेएमएम अशा सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे आणि कारवाई थांबणार नाही, मग त्यांनी कितीही एजन्सी राजकीय असल्याचा आरोप केला तरी चालणार नाही. कारण भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी या दोन्हींविरोधात कठोर राहूनच ही लढाई जिंकली जाणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांचे मत स्पष्ट आहे.

खरं तर 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जनतेने स्पष्ट बहुमताने जिंकून दिले आणि तत्कालीन मनमोहन सरकारवर अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेने विश्वास व्यक्त केला आणि गेल्या 8 वर्षात ते हे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पंतप्रधानांनी “ना खाऊंगा ना खाने दुंगा” असा संदेश आधीच दिला होता, त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधानांचे शून्य सहिष्णुतेचे धोरण सर्वांना माहित आहे.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.