चेटकीणीने मागितली लिफ्ट, नजर भिडताच खेळ खल्लास.., भयाण रात्री हादरवून टाकणारी घटना

प्रयागराज शहरापासून 13 किलोमीटर बैरहाना परिसर आहे. हे एक झपाटलेले ठिकाण असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी जुनी गोरा स्मशानभूमी आहे. येथील एक घटना आता समोर आली आहे.

चेटकीणीने मागितली लिफ्ट, नजर भिडताच खेळ खल्लास.., भयाण रात्री हादरवून टाकणारी घटना
chetkin
| Updated on: Aug 02, 2025 | 3:51 PM

भारतात अनेक भीतीदायक ठिकाणे आहेत. उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरापासून 13 किलोमीटर बैरहाना परिसर आहे. हे एक झपाटलेले ठिकाण असल्याचे बोलले जाते. या ठिकाणी जुनी गोरा स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत 600 पेक्षा जास्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मृतदेह पुरलेले आहेत. ही स्मशानभूमी तिची डिझाइन, कोरीवकाम आणि बांधकामाच्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसा अनेक लोक ही स्मशानभूमी पाहण्यासाठी येतात. मात्र संध्याकाळी 6 नंतर या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. याचे कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

चेटकीणीने लिफ्ट मागितली अन्…

10 वर्षांपूर्वी जुलै 2015 मध्ये किडगंज पोलिस स्टेशन परिसरातील 24 वर्षीय रूपेशचा अचानक मृत्यू झाला होता. यानंतर रूपेशचे वडील मूलचंद यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. त्यांच्या मते या मृत्यूचा संबंध स्मशानभूमीशी आहे. मूलचंद यांनी सांगितले की, रूपेश एके दिवशी सायंकाळी स्कूटरने एका लग्नावरून घरी परतत होता. या स्मशानभूमीपासून एक किलोमीटर अंतरावर बुरखा असलेल्या एका मुलीने रूपेशकडे लिफ्ट मागितली. रूपेशने तिला लिफ्ट दिली, त्यानंतर ती मुलगी स्मशानभूमीजवळ उतरली. ती खाली उतरल्यानंतर रुपेशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तो घाबरला. घरी आल्यानंतर तो आजारी पडला आणि 24 तासांमध्ये त्याचा मृत्यू झाला.

आतापर्यंत अनेकांचा मृत्यू

स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, आतापर्यंत चार लोकांचा अशाप्रकारे मृत्यू झाला आहे. लोकांच्या माहितीनुसार, या रस्त्यावर बुरखा असलेली महिला लिफ्ट मागते, उतरल्यानंतर त्यांना आपला चेहरा दाखवते, त्यानंतर लोक आजारी पडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. यामागचे नेमके कारण काय आहे ते अद्याप समजू शकलेले. ही अंधश्रद्धा आहे की दुसरं काही हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता, मात्र त्यातून काहीही समोर आलेलं नाही. Tv9 मराठी देखील अशा कथांचे समर्थन करत नाही.

अनेक अधिकाऱ्यांना दागिन्यांसह पुरले

अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक योगेश्वर तिवारी यांनी या स्मशानभूमीबाबत सांगितले की, इंग्रजांनी ही भव्य स्मशानभूमी बांधलेली आहे. अनेक व्हीआयपी ब्रिटिश अधिकाऱ्यांना महागडे कपडे आणि दागिन्यांसह येथे दफन करण्यात आलेले आहे. या अधिकाऱ्यांच्या कबरींमध्ये महागड्या दगडांचे शिलालेख किंवा त्यांच्या नावाच्या पाट्या लावल्या गेल्या होत्या, मात्र ही माहिती समजताच चोरांनी या कबरींवरील या पाट्या चोरल्या आहेत.

गॉथिक शैलीतील कबरी

प्राध्यापक तिवारी पुढे बोलताना म्हणाले की, 1857 मध्ये बांधलेल्या गोरा स्मशानभूमीतील कबरी या गॉथिक शैलीतील कबरी आहेत. या कबरींमध्ये लांब, टोकदार कमानी आणि उंच शिलालेख आहे. या कबरी सजवण्यासाठी बारीक कोरीवकाम करण्यात आलेली आहेत, तसेच त्यावर बायबलमधील काही ओळीही कोरलेल्या आहेत.