‘टॉयलेटच्या दारात तो माझ्या मागे..,’ ट्रेनमध्ये परदेशी महिलेला धक्कादायक अनुभव Video

प्रसिद्ध परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर इनेस फारिया हीने भारतीय ट्रेनमधील 3AC कोच तिला आलेला भीतीदायक अनुभव शेअर केला आहे. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव: चे गुणगाण करत असते. मात्र,प्रत्यक्षात सत्य परिस्थिती वेगळीच आहे हे हा व्हिडीओ सांगतो....

टॉयलेटच्या दारात तो माझ्या मागे.., ट्रेनमध्ये परदेशी महिलेला धक्कादायक अनुभव Video
3AC
| Updated on: May 29, 2026 | 9:41 PM

भारत हा देश अतिथी देवो भव: या संस्कृतीसाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. परंतू या देशात जर कोणा परदेशी पाहुण्याला भीती आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला असेल तर काय म्हणावे. देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सतत ऐरणीवर असतो. परंतू अलिकडेच एका परदेशी महिला ट्रॅव्हल व्लॉगर इनेस फारिया हीने भारतीय ट्रेनमध्ये तिला मिळालेल्या धक्कादायक अनुभवाला शेअर करत महिलांना आजही प्रवासात कशी वागणूक मिळेत आणि पुरुषांपासून कसा दहशतीचा सामना करावा लागतो हे स्पष्ट होत आहे.

सोशल मीडियावर भारतातील सुंदरता आणि संस्कृतीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करणारी प्रसिद्ध परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर इनेस फारिया हीने अलिकडे भारतीय रेल्वेत तिला आलेला एक धक्कादायक आणि भीतीदायक अनुभव शेअर केला आहे.

ट्रेनमध्ये 3AC कोचमध्ये जेथे लोक स्वत:ला सुरक्षित मानून निवांतपणे झोपण्याची आशा करतात. येथे इनेस परदेशी ट्रॅव्हल व्लॉगर सोबत काही असे काही झाले जे ऐकून कोणालाही धक्का बसेल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्यांच्या व्हिडीओने केवळ परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. इनेस हीने तिच्या इस्टाग्रामवर ही शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन लिहिली आहे की , ‘नेहमी स्वत:च्या instinct वर विश्वास ठेवा ‘

इनेस हीने सांगितला धक्कादायक अनुभव

इनेस फारिया नेहमी भारताच्या वेगवेगळ्या भागात फिरुन आपल्या प्रवासाचे व्हिडीओ शेअर करत असते. तिने तिच्या लेटेस्ट व्हिडीओ सांगितले की हा प्रकार जेव्हा सुरु झाला जेव्हा तिच्या सीट समोर येऊन ४-५ मुलांचा ग्रुप बसला. एक मुलगा तिला सारखे निरखून पाहात होता. ते असे पाहात होते की त्यांनी जीवनात कोणा महिलेला पाहिले नाही. ते वारंवार स्वत:ची सीट बदलून तिला टक लावून पाहात होते असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

टॉयलेटपर्यंत पाठलाग

इनेस हीने सांगितले की जेव्हा त्या मुलांची धीटाई वाढत चालल्याचे पाहून ती दुसऱ्या कम्पार्टमेंटच्या वॉशरुमकडे गेली. तेव्हा त्या मुलांपैकी एक जण तिच्या पाठी मागे चालत आला. टॉयलेटच्या बाहेर एक पाऊल तिच्या मागे तो उभा राहिला होता. जेव्हा ती आत गेली तर केवळ ३० सेकंदानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझा मित्र तेथे येऊन उभा राहिला, ज्याने त्याला माझ्या पाठी येताना पाहिले होते.

रेल्वे स्टाफने बदलली सीट

या घटनेनंतर लागलीच इनेस आणि तिच्या मित्राने भारतीय रेल्वेच्या स्टाफला तक्रार केली. दिलाशाची बाब ही की रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरतेला पाहून लागलीच एक्शन घेतली. सुरक्षेसाठी स्टाफने इनेस आणि तिच्या मित्राला 3AC मधून 2AC मध्ये शिफ्ट केले. ज्यामुळे इनेस हीने एक सुरक्षित जागा म्हटले. व्लॉगरने रेल्वे स्टाफची स्तूती करत लिहिले की ट्रेनच्या त्या स्टाफचे खूप खूप आभार ज्यांनी आमची मदत केली.

येथे व्हिडीओ पाहा –

सोशल मीडियावर लोक इनेस हिच्या व्हिडीओवर कमेंट करत आहेत. बहुतांश भारतीय महिला यांवर प्रतिक्रीया देताना एक भारतीय महिला म्हणून आम्ही स्वत:ला सुरक्षित समजत नाही असे म्हटले आहे. दुसऱ्या एका महिलेने लिहिले की आमच्यासाठी अशा घटनांचा सामना करणे एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us