तब्बल 39 बायका 89 मुलं, जगातील सर्वात मोठ्या परिवाराच्या मुखियाचं निधन

जगातील सर्वात मोठा परिवार असणाऱ्या चाना परिवाराचे मुखिया जिओना चाना (Ziona Chana) यांच निधन झालं आहे.

तब्बल 39 बायका 89 मुलं, जगातील सर्वात मोठ्या परिवाराच्या मुखियाचं निधन
चाना परिवार

ऐझाल : जगातील सर्वात मोठा परिवार म्हणून भारतातील मिझोरम येथील चाना परिवाराला ओळखले जाते. या परिवाराचे मुखिया जिओना चाना (Ziona Chana) यांच रविवारी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मधुमेह आणि अतिताणामुळे जिओना आजारी होते. मिझोरमच्या मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विट करत या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी ट्विटद्वारे जिओना यांना श्रद्धांजली वाहिली. (Head of Worlds largest family Zion a Chana dies at Aizawl mizoram)

जिओना हे 76 वर्षांचे होते. त्यांना तब्बल 38 बायका, 89 मुलं आणि 33 नातवंड होती. मागील काही दिवस त्यांचा मधुमेहाचा त्रास वाढला होता. सोबतच त्यांना अतिताणाचाही त्रास होता. ज्यामुळे रविवारी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे घरीट उपचार घेणाऱ्या जिओना यांना त्वरीत ऐझालच्या त्रिनिटी रुग्णालयात नेण्यात आले. पण तेथे आणताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे डायरेक्टर डॉ. लल्रिन्ट्रुंगा यांनी पीटीआयला याबाबतची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मिझोरमच्या मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी जिओना यांच्या जाण्याची माहिती ट्विट करत दिली. त्यांनी ट्विटमध्ये  लिहिलं,”दुखद मनाने आम्हाला 38 बायका आणि 89 मुलं असणाऱ्या आमच्या जिओना चाना यांना श्रद्धांजली वाहावी लागत आहे. मिझोरमधील बकत्वांग हे गाव जिओना यांच्यामुळे एक पर्यटन स्थळ बनलं होतं. जिओना यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

कोण होते जिओना?

21 जुलै, 1945 रोजी जन्माला आलेले जिओना हे जगातील सर्वात मोठ्या परिवाराचे मुखिया होते. ते आपल्या सर्वात पहिल्या बायकोला 17 वर्षाचे असताना भेटले होते. ती त्यांच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली. जिओना राहत असलेल्या घराचे नाव ‘चुआन थार रन’ असे होते. डोंगराळ भागात असलेले या घरात 100 खोल्या होत्या. 38 पत्नी त्यांची 89 मुलं आणि 14 सूनांसह 33 नातवंड असा मोठा परिवार जिओना यांच्या मागे आहे.

हे ही वाचा : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Head of Worlds largest family Zion a Chana dies at Aizawl mizoram)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI