VIDEO : हिमाचल प्रदेशात नॅशनल हायवेवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली बस आणि दोन कार, भयानक थरार

हिमाचल प्रदेशच्या सांगला व्हॅलीत दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटनेची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशाच्या किन्नोर येथे नॅशनल हायववेर दरड कोसळली आहे.

VIDEO : हिमाचल प्रदेशात नॅशनल हायवेवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली बस आणि दोन कार, भयानक थरार
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 2:56 PM

शिमला : हिमाचल प्रदेशच्या सांगला व्हॅलीत दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच आणखी एक दुर्घटनेची घटना समोर आली आहे. हिमाचल प्रदेशाच्या किन्नोर येथे नॅशनल हायववेर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर संबंधित परिसरातील रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. तसेच एक बस आणि दोन कार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. संबंधित घटना ही आज (11 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. अजूनही डोंगरावरील काही दगडं खाली पडत आहेत. या दुर्घटनेत जवळपास 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे.

घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संबंधित घटना ही किन्नौर जिल्ह्यातील चौरा येथील नॅशनल हायवेवर घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे काही व्हिडीओ देखील समोर येत आहेत. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेली बस ही किन्नोरहून शिमलाच्या दिशेला निघाली होती. या दरम्यान चौरा येथे भूस्खलनाची घटना घडली.

बचाव पथकाचं युद्ध पातळीवर काम सुरु

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन सतर्क झालं आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफचं पथक आणि भारतीय सैन्याचे जवान घटनास्थळ दाखल झाले असून मदत कार्याला सुरुवात झाली आहे. पण अजूनही डोंगरावरुन दगड खाली पडत असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक सर्वोतोपरी मेहनत घेत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा :

तळीये दुर्घटनेच्या 15 दिवसांनी आणखी एक मृत्यू, मृतांचा आकडा 85 वर

तळीये ग्रामस्थांच्या पुनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच 60 घरांचे पुनर्वसन, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.