AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himanta Biswa Sarma Networth : ना कार, ना घर.. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हिंमत बिस्वा सरमा किती श्रीमंत ? संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर

Himanta Biswa Sarma Networth : आसाम निवडणुकीत हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली. हिंमत बिस्वा सरमा यांनी आसाममध्ये पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून भाजपला दणदणीत विजय मिळवून दिलाय. हिंमत सरमा यांची एकूण संपत्ती किती ?

Himanta Biswa Sarma Networth : ना कार, ना घर.. नॉर्थ ईस्टच्या राजकारणाचे किंग हिंमत बिस्वा सरमा किती श्रीमंत ? संपत्तीबद्दल मोठी माहिती समोर
हिंमता बिस्वा सरमा यांची संपत्ती किती ?
| Updated on: May 05, 2026 | 11:02 AM
Share

आसाम विधानसभा निवडणुकीत (Asam Election Results 2026) हिंमत बिस्वा सरमा यांची जादू पुन्हा चालली असून त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयाची हॅटट्रिक करत विजयी झेंडा फडकावला. एनडीने 101 जागा जिंकल्या. त्यात आसाम गण परिषद आणि बोडोलैंड पीपुल्स फ्रंटने 10-10 जागा जिंकल्या. खास गोष्ट म्हणजे भाजपने आपल्याच बळावर बहुमताचा 64 जागांचा आकडा पार केला. यंदा भाजपला 82 जागा मिळाल्या आहेत.

पुन्हा सत्तेवर येण्याच्या तयारीत असलेल्या हिंमत बिस्वा सरमा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी संपत्तीबाबात खुलासा केला आहे. ते व त्यांच्या पत्नीची एकत्रित निव्वळ संपत्ती 35 कोटी रुपये आहे. हिंमत बिस्वा सरमा सरमा हे शेअर बाजारापासून दूर राहत असले तरी, त्यांच्या पत्नीने शेअर्समध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

कोट्यवधीची संपत्ती, कार नाही

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, हिंमत बिस्वा सरमा यांनी आपली एकूण मालमत्ता 35.16 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आणि 16.86 कोटी रुपयांच कर्ज असल्याचेनमूद केलं. गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी पदवी घेतलेल्या हिंमत यांच्याकडे निवडणुकीच्या सुरुवातीला 2 लाख रुपये रोख होते, तर त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांमध्ये 1.42 कोटी रुपयांचे डिपॉझिट होतं. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असूनही, हिंमत सरमा यांच्याकडे स्वतःची गाडी मात्र नाहीये. असं असलं तरी त्यांच्या पत्नीच्या नावे 21 लाख रुपयांची गाडी असल्याचे समोर आले आहे.

हिंमत सरमा यांच्या पत्नीची एक मीडिया कंपनी देखील आहे. प्राइस ईस्ट एंटरटेनमेंट लिमिटेड (Pride East Entertainment Pvt Ltd) असं कंपनीचं नाव असून त्या चेअरमन-एमडी आहेत.

शेअर्समध्ये गुंतवणूक

हिंमता बिस्वा सरमा यांना शेअर बाजारात कोणताही रस नाही आणि त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या त्यांनी कोणत्याही शेअर्स, बॉण्ड्स किंवा डिबेंचर्समध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. मात्र, असं असलं तरीही त्यांच्या पत्नीचा मोठा स्टॉक पोर्टफोलिओ आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, सरमा यांच्या पत्नीकडे नॉन लिस्टेड कंपन्यांचे 2.74 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत, तर त्यांनी म्युच्युअल फंडांमध्ये 2 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे. तसेच त्यांनी इतर शेअर्समध्ये 2.63 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही नमूद करण्यात आली आहे.

हिंमत सरमा यांच्या नावे कोणतीही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी नाहीये, तर त्यांच्या पत्नीच्या नावे HDFC Life ची 1 कोटीपेक्षा जास्त किमतीची पॉलिसी आहे. या पती-पत्नी, दोघांवर मिळून 5 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

कोट्यवधींचे दागिने

आसाममध्ये भाजपाचा विजयी झेंडा फडकावणारे हिंमत सरमा यांच्याकडे 180 ग्रॅम सोन्याचे दागिने असून त्यांची किंमत 25 लाखांच्या आसपास आहे. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, सरमा यांच्या पत्नीकडे 2.03 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. एकूण पाहिलं तर हिंमत सरमा यांची पत्नी त्यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत आहे. हिंमत बिस्वा सरमा यांची संपत्ती 2.36 कोटी तर त्यांच्या पत्नीकडे असलेल्या मालमत्तेची किंमत 13.65 कोटी आहे.

कारप्रमाणेच, हिंमत बिस्वा सरमा यांच्या मालकीचे कोणतेही घरं किंवा जमीन नाही, परंतु त्यांच्या पत्नीच्या नावे कोट्यवधी रुपयांची जमीन आणि घरं आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीचे 7.25 कोटी रुपयांचे प्लॉट आहेत. तसेच त्यांच्या मालकीची 12 कोटी रुपयांची दोन घरेही आहेत.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी