AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाची भयानक भविष्यवाणी, लाखों लोकांच्या जीवाला धोका

भारत आणि पाकिस्तानमध्ये अणूयुद्ध झाले तर सुमारे ५० ते १२५ दशलक्ष लोक तात्काळ मारले जाऊ शकतात. पाकिस्तान आणि भारतातील प्रमुख शहरे पूर्णपणे नष्ट होतील किंवा राहण्यायोग्य राहणार नाहीत. शिवाय, पायाभूत सुविधांचा पूर्णपणे नष्ट होईल असे संशोधन अहवालात म्हटले आहे.

भारत-पाकिस्तान अणूयुद्धाची भयानक भविष्यवाणी, लाखों लोकांच्या जीवाला धोका
| Updated on: May 09, 2025 | 8:48 PM
Share

भारत आणि पाकिस्तान यांनी वाढत्या तणावामुळे २०१९ रोजी एका संशोधनात्मक अहवालात एक भयानक भविष्यवानी केली आहे.ज्यात साल २०२५ मध्ये आण्विक संघर्षाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.एका अभ्यासात भारत आणि पाकिस्तानात अतिरेकी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक युद्ध भडकू शकते. त्याचा शेवटी आण्विक युद्धात परिवर्तित होऊ शकतो…

या अभ्यास अलिकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. यात २६ पर्यटकांचा मृत्य झालेला आहे. या हल्ल्यानंतर दोन्ही देशात मोठा ताण पसरला आहे.आणि अनेक पाकिस्तानी नेत्यांनी अणू हल्ल्याची धमकी दिली आहे.

शोध निबंधात काय म्हटले आहेत. रुटलेजद्वारा प्रकाशित या संशोधनात असे म्हटले आहे की भारत -पाकिस्तान युद्धाच्या संभाव्य कारणांचा छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.संशोधन कर्त्याचे म्हणणे आहे की जर कोणताही मोठा अतिरेकी हल्ला झाला तर तो भारताला नियंत्रण रेषार ( एलओसी ) वर सैनिकांना तैनात करण्यास भाग पाडेल. त्यानंतर पाकिस्तान देखील त्यांचा सैन्याला तयार करेल.दोन्ही देशातील झटापट वाटेल. यातून ताण-तणाव वाढतच राहील.जर भारतीय सेना पाकमध्ये शिरली तर ते त्यांच्या सीमेच्या रक्षणाकरीता पाकिस्तान अणू हल्ल्याची धमकी देऊ शकतो.

भारत-पाकिस्तान युद्धाच्या अभ्यासानुसार, जर भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत प्रवेश केला तर पाकिस्तान पहिल्या दिवशी ५ किलोटन क्षमतेची १० अण्वस्रे वापरेल. यानंतर, दुसऱ्या दिवशी, पाकिस्तान आणखी १५ अणुबॉम्ब टाकेल. भारत प्रत्युत्तर देईल आणि पाकिस्तानच्या लष्करी प्रतिष्ठानांवर आणि अण्विक तळांवर २० अणुबॉम्ब टाकेल. या स्फोटांमुळे हिरोशिमावरील बॉम्बहल्ल्यासारखे विनाशकारी परिणाम जगावर होतील.

तिसऱ्या दिवशी पाकिस्तान भारतीय चौक्या, नौदल तळ आणि शहरी हवाई क्षेत्रांवर ३० हवाई हल्ले करेल, तसेच आणखी १५ सामरिक हल्ले करेल. भारत पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अणुहल्ले करून प्रत्युत्तर देईल. पुढील तीन दिवसांत पाकिस्तान आपल्या संपूर्ण अण्वस्त्रांचा वापर करेल आणि भारतातील प्रमुख शहरांना लक्ष्य करेल, असा संशोधकांना भीती आहे. भारतही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या लष्करी तळांवर अणुहल्ले करेल. या संपूर्ण घटनेमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड विनाश होईल आणि लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

इतके लोक जागीच ठार होऊ शकते

भारत आणि पाकिस्तानमध्ये अणूयुद्ध झाले तर सुमारे ५० ते १२५ दशलक्ष लोक तात्काळ मारले जाऊ शकतात. पाकिस्तान आणि भारतातील प्रमुख शहरे पूर्णपणे नष्ट होतील किंवा राहण्यायोग्य राहणार नाहीत. शिवाय, पायाभूत सुविधांचा पूर्णपणे नष्ट होईल, ज्यामुळे आरोग्य सेवा, वाहतूक, ऊर्जा आणि वित्तीय संस्थांवर परिणाम होईल. याशिवाय, युद्धानंतर निर्माण होणारा धूर आणि एसिडचा पाऊस यांचाही हवामानावर भयानक परिणाम होईल. यामुळे जागतिक दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा परिणाम अब्जावधी लोकांवर होऊ शकतो.

या संशोधनाचा संदेश काय आहे?

या संशोधनाचा संदेश काय आहे? या संशोधनात असा इशारा देण्यात आला आहे की भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्धाचे परिणाम केवळ या दोन देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी विनाशकारी परिणाम होऊ शकतात. दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत आणि जर त्यांचा वापर झाला तर लाखो लोक मारले जातील आणि त्याचा संपूर्ण जगाच्या पर्यावरणावर आणि जीवनशैलीवर विनाशकारी परिणाम होईल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...