मर्सिडिझ-मेबॅक ते लँड क्रुझर, मोदींच्या ताफ्यात किती गाड्या; वाचा विशेषता काय?

मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडिझ-मेबॅक एस 650 ही सर्वात महत्त्वाची एक कार असते. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. या कारला व्हीआर-10 रेटिंग आहे. ही कार म्हणजे चालते-फिरते बंकर असल्याचे बोलले जाते.

मर्सिडिझ-मेबॅक ते लँड क्रुझर, मोदींच्या ताफ्यात किती गाड्या; वाचा विशेषता काय?
pm narendra modi convoy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 4:12 PM

Narendra Modi Convoy : भारतात निर्माण झालेल्या उर्जासंकटाला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीने वागण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यातील मंत्र्यांच्याही ताफ्यातील गाड्या कमी केल्या जात आहेत.

पंतप्रधानांच्या ताफ्यात एकूम 24 गाड्या

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात नेमक्या किती गाड्या असतात? त्या गाड्यांचे काम काय असते? हे जाणून घेऊ या. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताभ्यात कमीत कमी एकूण 18 मुख्य गाड्या असतातत. यासह वाहतूक आणि अन्य गोष्टींची काळजी घेण्यासाठी अतिरिक्त सहा ते आठ गाड्या तैनात असतात. म्हणजेच मोदी यांच्या ताफ्यात साधारण 24 गाड्या असतात. या गाड्यांमुळे पंतप्रधानांची सुरक्षा अभेद्य ठेवली जाते. या ताफ्यात एक पायलट कार, एस्कॉर्ट वाहन, जॅमर गाडी, रुग्णावाहिका यांचा समावेश असतो.

ताफ्यातील गाड्यांचे नेमके काम काय?

मोदी यांच्या ताफ्यात मर्सिडिझ-मेबॅक एस 650 ही सर्वात महत्त्वाची एक कार असते. ही कार सर्वात सुरक्षित मानली जाते. या कारला व्हीआर-10 रेटिंग आहे. ही कार म्हणजे चालते-फिरते बंकर असल्याचे बोलले जाते. या कारवर एके-47 बंदुकीतून गोळीबार केला तरी आतली व्यक्ती सुरक्षित राहते. तसेच हँड ग्रेनेड फेकले तरीही कारला काहीच होत नाही. या कारच्या दोन मीटर अंतरावर 15 किलोचा टीएनटी ब्लास्ट झाला तरी आतली व्यक्ती सुरक्षित राहते. कारमध्य इमर्जन्सी ऑक्सिजनची सुविधा आहे.

मोदी यांच्या ताफ्यात कोण-कोणत्या गाड्या?

दुसरीकडे एक गाडी जॅमर म्हणून काम करते. या गाडीच्या वर अनेक अँटिना असतात. हा अँटिना रेडिओ सिग्नल ठप्पा करतो. पंतप्रधानांच्या ताफ्यात रेंज रोव्हर सेंटिनल, टोयोटा लँड क्रुझर, बीएमडब्ल्यू-7 यासारख्या मोठ्या गाड्या असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या ताफ्यात काही डमी कारदेखील असतात. हल्लोखोर ऐनवेळी गोंधळात पडावा यासाठी या डमी कार ठेवलेल्या असतात. दरम्यान, पंतप्रधानांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळेच एवढ्या गाड्यांचा ताफा असतो.

Follow Us