AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जयप्रकाश बाबू जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी आले होते, पण आणीबाणीनंतर… मोहन भागवत यांनी सांगितलेला किस्सा काय?

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आरएसएसच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एक खास किस्सा सांगितला आहे. भागवत यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

जयप्रकाश बाबू जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी आले होते, पण आणीबाणीनंतर... मोहन भागवत यांनी सांगितलेला किस्सा काय?
mohan bhagwat
| Updated on: Aug 28, 2025 | 9:28 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएस ही एक हिंदू समाजासाठी काम करणारी संघटना आहे असे म्हटले जाते. तसेच ही संघटना मुस्लिमविरोधी आहे असाही प्रचार केला जातो. मात्र आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता मुस्लिम लोकांबाबत केलेले एक विधान आता चर्चेत आले आहे. आरएसएसच्या 100 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी एक किस्साही सांगितला आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोहन भागवत यांनी एक किस्सा सांगताना म्हटले की,’1948 मध्ये जयप्रकाश बाबू हातात जळती मशाल घेऊन संघ कार्यालय जाळण्यासाठी गेले होते. मात्र आणीबाणीनंतर ते संघाच्या शिक्षा वर्गात आले त्यावेळी त्यांनी बदलाची आशा फक्त तुमच्याकडून आहे असं विधान केले आहे. पुढे धर्मांतर आणि बेकायदेशीर घुसखोरीबाबतच्या प्रश्नांवर बोलताना भागवत यांनी मोठं विधान केलं आहे.

मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, ‘भारतातील लोकसंख्या संतुलन बदलण्यासाठी तीन घटक जबाबदार आहेत. पहिला घटक म्हणजे धर्मांतर, जे परंपरेविरुद्ध आहे. काही मुस्लिम उलेमांनी मला असं सांगितलं की, इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतर करणे पाप आहे. दुसरा घटक म्हणजे बेकायदेशीर स्थलांतर, यामुळे रोजगार आणि सामाजिक तणाव निर्माण होतो. तिसरा घटक म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर, यात संतुलन गरजेचे आहे. मुस्लिम लोकांनी कमीत कमी 3 मुले जन्माला घालावीत, यामुळे समाजात असंतुलन निर्माण होणार नाही.’

इस्लाम राहणार नाही असं आम्ही म्हटलं नाही – भागवत

मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, ‘आम्ही कधीही म्हटले नाही की इस्लाम भारतात राहणार नाही. कारण जातीवाद हा आपल्या विकासात अडथळा आहे. त्यामुळे जातीवादाला महत्व न देता प्रत्येकाने एकमेकांच्या घरी येणे-जाणे करावे. कारण प्रत्येकाचा DNA सारखाच आहे. शोषणमुक्त समाज असावा अशी आमची भूमिका आहे. आमचे स्वयंसेवक कधीही अत्याचार करू शकत नाहीत असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.