Gas Cylinder : एका LPG सिलिंडरवर कमिशन किती? डिलिव्हरी बॉयची कमाई वाचून धक्काच बसेल!

युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयला किती कमिशन मिळते, ते जाणून घेऊ या.

Gas Cylinder : एका LPG सिलिंडरवर कमिशन किती? डिलिव्हरी बॉयची कमाई वाचून धक्काच बसेल!
gas cylinder delivery commission
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 26, 2026 | 7:07 PM

Gas Cylinder Commission : देशभरात घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. सोबतच गॅस सिलिंडरचा तुटवडाही निर्माण झाला आहे. गॅस बुक करूनही लोकांना पुढचे कित्येक दिवस गॅस मिळत नाहीये. काही ठिकाणी गॅस सिलिंडरची ब्लॅक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. तशी काही प्रकरणं समोर आली आहेत. दरम्यान, गॅस डिलिव्हरी व्हेंडर्सना गॅसची डिलिव्हरी केल्यानंतर किती कमिशन मिळते, तुमच्या घरापर्यंग गॅस घेऊन येणाऱ्या गॅस डिलिव्हरी बॉयला किती रुपये मिळतात? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…

गॅस डिस्ट्रिब्यूटर कंपनीला किती कमिशन मिळते?

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या डिस्ट्रिब्यूटर कंपनीला एका गॅसच्या डिलिव्हरीमागे किती रुपये मिळतात, ते अगोदर जाणून घेऊ या. घरात स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची होम डिलिव्हरी दिल्यावर डिस्ट्रिब्यूटर कंपनीला 80 ते 88 रुपये मिळतात. गोदामाची देखभाल, डिलिव्हरी खर्च म्हणून डिस्ट्रिब्यूटर कंपनीला ही राशी दिली जाते. हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीमागे डिस्ट्रिब्यूटर कंपनीला 100 रुपये कमिशन मिळते.

गॅस सिलिंडर डिलिव्हरी बॉयला किती कमिशन मिळते?

गॅस सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक सिलिंडरमागे 20 ते 25 रुपये कमिशन मिळते. त्या व्यक्तीने दिवसभरात 30 गॅसची सिलिंडरची डिलिव्हरी केली तर त्याला साधारण 600 ते 750 रुपये मिळतात. सणासुदीच्या काळात या व्यक्तीकडून दिवसाला साधारण 50 सिलिंडरची डिलिव्हरी केली जाते. त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची प्रत्येक दिवसाला 1,000 ते 1,250 रुपयांपर्यंत कमाई होते. म्हणजेच प्रत्येक डिलिव्हरी बॉयला त्याच्या कामातून महिन्याला साधारण 15,600 ते 19,500 रुपये मिळतात. गॅस सिलिंडरची जास्त डिलिव्हरी केली तर हा पगार 32,000 रुपयांपर्यंत वाढतो. गॅस सिलिंडरची मागणी वाढल्यावर काही डिलिव्हरी बॉय दिवसाला 100 सिलिंडरचीही डिलिव्हरी करतात. अशा वेळी त्यांची रोजची मिळकत 2,500 रुपयांपर्यंत वाढते. म्हणजेच महिन्याला ते साधारण 65,000 रुपयांपर्यंत कमाई करू शकतात.

Follow Us