तुम्ही घरात जास्तीत जास्त किती पैसा ठेवू शकता? आयकर विभागानं दिलं उत्तर
वीजेचं बील, मोबाइलचं रिचार्ज, अशा अनेक गोष्टींसाठी आपण ऑनलाईन पेमेंट करतो. मात्र तरी देखील काही गोष्टींसाठी लोकांना पैशांची गरज असते. त्यामुळे अनेकजण आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश ठेवतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की घरामध्ये किती रुपयांपर्यंत रोकड ठेवता येते?

आज तंत्रज्ञानाचं युग आहे, अशा या युगामध्ये प्रत्येकाला वाटलं की जगातील प्रत्येक सर्वोत्तम सुविधा आपल्याकडे असावी, त्या तंत्रज्ञानाच्या खरेदीसाठी आपल्याकडे पुरेसा पैसा हवा, आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असावं, आपल्याकडे पुरेसा पैसा असवा, हा पैसा कमावण्यासाठीच काही जण नोकरी करतात तर काही जर व्यावसाय करतात. नोकरी किंवा व्यावसायामधून तुम्ही जेवढा पैसा कमवता, त्यातून तुम्ही तुमचं घर चालवता, तसेच तुमचं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी देखील काही पैशांची बचत करतात. आजच्या काळात जवळपास सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत.
जसं की वीजेचं बील, मोबाइलचं रिचार्ज, अशा अनेक गोष्टींसाठी आपण ऑनलाईन पेमेंट करतो. मात्र तरी देखील काही गोष्टींसाठी लोकांना पैशांची गरज असते. त्यामुळे अनेकजण आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश ठेवतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? की घरामध्ये किती रुपयांपर्यंत रोकड ठेवता येते? याची काही लिमिट आहे का? जर असेल तर तुम्ही तुमच्या घरात किती रुपयांपर्यंत कॅश ठेवू शकता? या दोन प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहेत.
जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही तुमच्या घरात किती रक्कम ठेवू शकता? तर आयकर विभागानं याबाबत असा कोणताही नियम तयार केलेला नाहीये, आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकतात, तुमच्या घरात किती रोकड आहे, यावरून तुमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.
इनकम टॅक्स डिपार्टमेंटनुसार तुम्ही तुमच्या घरात किती रक्कम ठेवावी यावर कुठलंही बंधन नाही, मात्र जर तुमच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला तर तुम्हाला तुमच्या घरात असलेल्या रोकड पैशांचा स्त्रोत आयकर विभागाला सांगता आला पाहिजे, म्हणजे एवढी रोकड तुमच्याकडे कुठून आली, कशी आली हे सांगता आलं पाहिजे, तुम्ही जर तुमच्याकडे असलेल्या पैशांबाबत योग्य उत्तर दिलं तर तुमच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या पैशांचा तपशील सांगता यायला हवा.
