ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी, RAW ने 21 टारगेट दाखवले, 3 मे रोजी प्लॅनिंग, 5 मे रोजी मंजुरी

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी रणनीती तयार होऊ लागली होती. रॉ या गुप्तचर संस्थेकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव दिले.

ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी, RAW ने 21 टारगेट दाखवले, 3 मे रोजी प्लॅनिंग, 5 मे रोजी मंजुरी
| Updated on: May 09, 2025 | 2:29 PM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सार्वजनिक सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांना सोडणार नसल्याचे सांगितले होते. ते कल्पनाही करु शकणार नाही, असा धडा त्यांना दिला जाईल, असे रोखठोकपण सांगत पाकिस्तानला नाव न घेता स्पष्ट शब्दांत संदेश दिला होता. त्यामुळे पाकिस्तानवर मोठी कारवाई होणार असल्याचा विश्वास देशवासियांना होता. अखेर ऑपरेशन सिंदूरमुळे तो विश्वास सार्थ ठरला. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पराराष्ट्रमंत्री एस.जयशंकर, सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग, नौदल प्रमुख एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासोबत बैठकांचे सत्र सुरु झाले. रणनीती तयार होऊ लागली होती. रॉ या गुप्तचर संस्थेकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय झाला. त्यासंदर्भातील प्लॅनिंग ३...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा