
हिसार येथील ट्रॅव्हल व्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा आणि कैथलमधील मस्तगढ गावातील देवेंद्र सिंग (25) यांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. भारतात राहूनच पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या या लोकांचा पर्दाफाश झाला असून या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली आहे. यूट्यूबर ज्योतीला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण देशभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनले आहे. मात्र या दोघांचा बुरखा फाटला असला तरी देशात असे आणखी किती देशद्रोही आहेत? हा प्रश्न आता उपस्थित होतोय.
हरियाणा आणि पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांवर काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांच्याशी संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.
यूट्यूबर आणि ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक
खरंतर, प्रसिद्ध युट्यूबर आणि ब्लॉगर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्राला अटक केली.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी दानिश यांच्या सांगण्यावरून भारताविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर आहे.
ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राला शनिवारी हिसारमधील सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ती पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून संवेदनशील माहिती शेअर करत होती असे हरियाणा पोलिसांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानसह अनेक देशांची केली यात्रा
ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल-विथ-जो नावाचे एक यूट्यूब चॅनल चालवते. ज्योतीने पाकिस्तानसह अनेक देशांचा प्रवास केला होता आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याचे काम तिच्यावर सोपवण्यात आले होते.
2023 साली ती पाकिस्तानला भेट देणाऱ्या धार्मिक शिष्टमंडळाचा भाग होती असे चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सांगितले.
पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्याशी भेट
त्याचदरम्यान, व्हिसा औपचारिकता सुरू असताना, नवी दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीशी ज्योतीची भेट झाली. दानिशने तिला व्हिसा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि तिच्या ट्रॅव्हल ब्लॉगिंग कामाचे कौतुकही केलं. जर ती पाकिस्तानात गेली आणि एकटी भारतीय मुलगी पाकिस्तानात प्रवास करत असेल, असे ब्लॉग बनवले तर तिची (viewership) दर्शकसंख्या वाढेल आणि ती सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय होईल, असे आमिषही तिला दाखवण्यात आलं.
जर तिने तिच्या ब्लॉगमध्ये पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा दाखवली तर तिला भविष्यात पाकिस्तानला भेट देण्यासाठी व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही दानिशने ज्योतीला सांगितले. नंतर, पाकिस्तानला जाताना, दानिशच्या सल्ल्यानुसार ज्योतीची पाकिस्तानात अली अहसान नावाच्या दुसऱ्या माणसाशी भेट झाली. त्याने तिची भेट पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या (ISI) हँडलर सदस्यांशी करून दिली.
संवेदनशील माहिती केली शेअर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने त्यांच्याशी संवेदनशील माहिती शेअर केल्याची आणि ओळख टाळण्यासाठी बनावट नावांनी त्यांचे संपर्क मोबाईल फोनमध्ये सेव्ह केले, अशी कबुलीी तिने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती मल्होत्रा तीनदा पाकिस्तानला भेट दिली आहे, ज्यामध्ये ती दोनदा धार्मिक गटांसोबत गेली, तर एकदा ती एकटी पाकिस्तानला गेली आणि या काळात ती सतत पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या एजंट्सच्या संपर्कात राहिली.
पाकिस्तान नॅशनल डे चेही मिळाले निमंत्रण
एका व्हिडिओमध्ये ती दिल्लीतील पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिशशी बोलताना दिसत असल्याचे ज्योती मल्होत्राच्या ब्लॉगवरून उघड झाले. हा व्हिडिओ गेल्या वर्षी 28 मार्च 2024 रोजी दिल्लीतील चाणक्यपुरी भागातील पाकिस्तान दूतावासात आयोजित पाकिस्तान राष्ट्रीय दिनानिमित्त झालेल्या इफ्तार पार्टीचा आहे. त्यावेळी दूतावासाने ज्योतीलाही आमंत्रित केले होते. या व्हिडिओमध्ये ज्योतीने दूतावासाची सुंदर सजावट दाखवली.
व्हिसा मिळवून दानिशने तिला पाकला पाठवलं
यानंतर तिची भेट अहसान उर रहीम उर्फ दानिशशी झाली. ज्योती सतत दानिशच्या संपर्कात होती असे सांगितले जात आहे. दानिशने तिला व्हिसा मिळवून देऊन पाकिस्तानला पाठवले होते. मात्तर, आपल्या मुलीच्या पाकिस्तान कनेक्शनबद्दल काहीच माहिती नाही. शुक्रवारी रात्री अचानक पोलिस आपल्या घरी आले आणि मुलीला अटक करून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला तेव्हा त्यांना धक्का बसला असे ज्योतीच्या घरच्याचं म्हणणं आहे.
खरंतर, ज्योती गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत राहत होती आणि तिच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल काम करत होती. पानिपतपासून कैथल किंवा हिसारपर्यंत पाकिस्तानी हेर असोत, ते सर्व उघड झाले आहेत आणि लवकरच त्यांचे संपूर्ण नेटवर्क नष्ट केले जाईल, असा दावा हरियाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर यांनी केला आहे.
भारतात आणखी किती हेर ?
पाकिस्तानी दूतावासात बसलेल्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि हँडलर दानिश यांनी प्रसिद्ध ब्लॉगर ज्योती मल्होत्राला त्यांचा गुप्तहेर बनवण्यात ज्या पद्धतीने यश मिळवले, त्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की
या लोकांनी भारतातील अनेक सामान्य लोकांना पाकिस्तानी व्हिसा मिळवून आणि त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचे हेरगिरीचे जाळे मजबूत केले आहे.
सध्या ज्योती मल्होत्राला 5 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे, या दरम्यान आणखी अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे. खरं तर, पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आणि भारतातील अनेक पाकिस्तानी अधिकाऱ्यांना परत पाठवलं, त्यामध्ये दानिशचाही समावेश होता. ज्योती सतत दानिशच्या संपर्कात होती.
देवेंद्र 2024 मध्ये पाकिस्तानला गेला
त्याच वेळी, हेरगिरीच्या आरोपाखाली विशेष गुप्तहेर युनिटने अटक केलेला देवेंद्र सिंग नोव्हेंबर 2024 साली कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे शीख भाविकांच्या गटासह पाकिस्तानला गेला होता. तिथे तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या, आयएसआयच्या एका एजंटच्या संपर्कात आला. देवेंद्र पाचपेक्षा जास्त पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
पाकच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला
देवेंद्र सिंहची फेसबुकवर एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली होती. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर, देवेंद्रने त्याच्या मोबाईल फोनने पटियाला लष्करी क्षेत्राचे फोटो काढले होते आणि ते आयएसआय एजंटना पाठवले होते, असाही आरोप लावण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी, त्याला पोलिस तपासाची कल्पना आली, त्यानंतर त्याने त्याच्या सर्व डिजिटल डिव्हाईसेसमधून डेटा डिलीट केला. त्याच्या अटकेनंतर आता सायबर क्राइम युनिट तो डेटा रिकव्हर करण्यात व्यस्त आहे. पोलिसांनी त्याचे मोबाईल फोन आणि इतर उपकरणे जप्त केली आहेत.
पंजाब युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी
आरोपी देवेंद्र सिंह हा पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील पंजाब विद्यापीठातून एमए पॉलिटिकल सायन्सचे शिक्षण घेत आहे. त्याने युनिव्हर्सिटीजवळच एक खोली घेतली होती. तो आठवड्यातून पाच दिवस इथे रहायचा आणि उर्वरित दोन दिवस तो मस्तगढ गावातील त्याच्या घरी याय