पाच वर्षांखालील मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ कसं बनवायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

आजच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हा एक अत्यावश्यक ओळखपत्र ठरला आहे. विशेषतः लहान मुलांच्या शैक्षणिक प्रवेश, आरोग्य सेवा, आणि विविध सरकारी योजनांच्या लाभासाठी देखील आधार कार्ड आवश्यक असतं. त्यामुळे भारत सरकारनं पाच वर्षांखालील मुलांसाठी खास ‘बाल आधार कार्ड’ योजना सुरू केली आहे.चला तर मग जाणून घेऊया बाल आधार कार्डसाठी लागणारी कागदपत्रं, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाचे तपशील स्टेप बाय स्टेप.

पाच वर्षांखालील मुलांसाठी बाल आधार कार्ड कसं बनवायचं? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
बाल आधार कार्ड
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 2:54 PM

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड एक महत्त्वाचा ओळख दस्तऐवज ठरला आहे. विशेषत: मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी, आरोग्यविषयक योजनांसाठी आणि गुंतवणुकीसाठीही आधार कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे पाच वर्षांखालील लहान मुलांसाठी भारत सरकारने ‘बाल आधार कार्ड’ हे विशेष ओळखपत्र जारी केलं आहे. हे कार्ड मिळवणं खूपच सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते.

काय आहे ‘बाल आधार कार्ड’?

बाल आधार हे पाच वर्षांखालील मुलांसाठी असणारं एक विशेष प्रकारचं आधार कार्ड आहे. मोठ्यांप्रमाणे या वयातील मुलांकडून बायोमेट्रिक माहिती म्हणजेच फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन घेतले जात नाहीत, कारण त्यांचा शारीरिक विकास अजून होत असतो. बाल आधार कार्डामध्ये फक्त मुलाची फोटो, नाव, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांची माहिती असते.

कुठे मिळते बाल आधार कार्ड?

बाल आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही जवळच्या अधिकृत आधार सेवा केंद्रावर जाऊ शकता. सध्या अनेक रुग्णालये, सरकारी आणि खासगी बाळाच्या जन्माच्या वेळीच आधार नोंदणी सुविधा देतात. यामुळे जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड एकत्र प्रोसेस केलं जातं, आणि पालकांना नंतर वेगळं जावं लागत नाही.

बाल आधारसाठी लागणारी कागदपत्रं:

1. बाळाचा जन्म प्रमाणपत्र (रुग्णालय किंवा नगरपालिकेकडून मिळालेला)

2. आई किंवा वडिलांपैकी कोणाचंही आधार कार्ड

3. पालकांचा मोबाईल नंबर

बाल आधारसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया:

Step 1: सर्व आवश्यक कागदपत्रं घेऊन जवळच्या आधार केंद्रावर जा.

Step 2: आधार नामांकन फॉर्ममध्ये बाळाची वैयक्तिक माहिती अचूकपणे भरा.

Step 3: कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती तपासणीसाठी द्या.

Step 4: त्या ठिकाणी बाळाचा फोटो काढून घेतला जाईल, बायोमेट्रिक माहिती या टप्प्यावर घेतली जात नाही.

Step 5: नावनोंदणी स्लिप मिळवा, ज्यामध्ये एक युनिक नंबर दिला जातो. याच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन अर्जाचा स्टेटस तपासू शकता.

का आहे हे कार्ड महत्त्वाचं?

बाल आधार कार्ड केवळ शाळा प्रवेशासाठीच नव्हे, तर बालकांच्या आरोग्य सेवेतील लाभ, सरकारी योजना आणि बँक अकाउंटसाठीदेखील उपयुक्त ठरतं. शिवाय, एकदा बाल आधार मिळाल्यानंतर पाच वर्षांनी बायोमेट्रिक माहिती नोंदवून ते अपडेट करावं लागतं.