AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : 6 जुलैच्या हिंदीविरोधी मोर्चासाठी उद्धव ठाकरेंशी बोलणार का?; राज ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर काय?

Raj-Udhav Thackeray : गेल्या दोन महिन्यांपासून दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्र जणू पिंजून काढला आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधुनी एकाच दिवशी रणशिंग फुंकले आहे. त्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार का, या प्रश्नाला असे थेट उत्तर दिले.

Raj Thackeray : 6 जुलैच्या हिंदीविरोधी मोर्चासाठी उद्धव ठाकरेंशी बोलणार का?; राज ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर काय?
राज ठाकरे साद घालणार, उद्धव ठाकरे साथ देणारImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 26, 2025 | 2:23 PM
Share

हिंदी भाषा सक्तीविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. आज गुरूवारी, 26 जून रोजी दोन्ही ठाकरेंनी सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा फैसला स्वतंत्रपणे जाहीर केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीविरोधात रणशिंग फुंकले. गेल्या दोन महिन्यांपासून दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्र जणू पिंजून काढला आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधुनी एकाच दिवशी रणशिंग फुंकले आहे. त्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार का, या प्रश्नाला असे थेट उत्तर दिले.

हा मराठीपण घालवण्याचा कटच

हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला. हा कट उद्ध्वस्त करण्यासाठी मराठी बांधवांनी भगिनींनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं. साहित्यिक एलकुंचवार यांनीही विरोध केला आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण सामील होतात हे पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे. नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं. ६ तारखेला सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार

या मोर्चासाठी मनसे पक्ष, संघटनांशी बोलणार आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही बोलणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या माणसाशी बोलणार असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. इतक्या दिवस मी जे बोलत होतो ना, कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ते तुम्हाला ६ तारखेला कळेल, असे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केला. त्यामुळे ६ जुलै रोजी राज्यात भाषिक अस्मितेसाठी दोन ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल समोर येत आहे.

गिरगाव चौपटीवरून मोर्चा

६ तारीख गंमत म्हणून निवडली नाही. पालक, विद्यार्थी आणि इतरांना शक्य होईल. रविवार, सुट्टी असल्याने सर्व येतील, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदी सक्तीविरोधात मनसे ६ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघेल. अनेक लोक बोलत असतात मोक्याच्यावेळी येत नाही. त्यात कलावंतही असतील. माझं बोलणं झाल्यावर सर्व येतील. विठ्ठलाला साकडं घालू सरकारला सुबुद्धी देवो, असे राज ठाकरे म्हणाले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.