AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंची FDA वर नियुक्ती कशी झाली, नियुक्तीवर नाराज होते..किस्सा

तुकाराम मुंढे यांची fda वर नियुक्ती कशी झाली या संदर्भात एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे. ते या पदावर काहीसे खूश नव्हते. मात्र, त्यांनी यापदाचा स्वीकार करण्याचा निर्णय कसा घेतला ते वाचा...

Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंची FDA वर नियुक्ती कशी झाली, नियुक्तीवर नाराज होते..किस्सा
Tukaram Mundhe
| Updated on: Aug 20, 2026 | 7:02 PM
Share

सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या धडाकेबाज कारवाईची सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. एफडीएच्या आयुक्तपदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी या डिपार्टमेंटमध्ये राहून भेसळ अन्न आणि इतर फसव्या जाहिराती यावरुन जे रान पेटवले आहे.याद्वारे सर्वसामान्य माणसाचे आयुष्य कमी करुन त्यांच्या पोटात भेसळ अन्न टाकणारे त्यांचा नफा कमी झाला म्हणून नाराज असून कोर्टात याचिका दाखल करत आहेत. परंतू सर्वसामान्य ग्राहकाला आता खरोखरच आपण राजा झाल्याचा सुखद भास होत आहे. मात्र, आयएएस तुकाराम मुंढे यांनी हे पद कसे स्वीकारले याचा रंजक किस्सा पुढे आला आहे.

आयएएस तुकाराम मुंढे यांची आतापर्यंत २५ वेळा बदली करण्यात आली आहे. मात्र, ही बदली कोणत्या त्या-त्या विभागातील कारवाई सरकारला भारी पडल्याने झाली आहे. प्रामाणिक पणे आपले काम करणारे तुकाराम मुंढे यांच्या या भेसळखोरांविरोधातील कारवाईने भ्रष्टाचार आणि काळाबाजार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आता तुकाराम मुंढे यांची या विभागात नियुक्ती करताना एफडीएचे आयुक्त पद हे त्यांच्या दृष्टीने पदावनीती होते. कारण या आधी त्यांनी याहून जास्त दर्जाचे पद भुषवले होते. ते काहीसे नाराज होते असे म्हटले जात आहे. मात्र, या संदर्भात आता एक आमदार शुभम कराड यांनी एक किस्सा सांगितला आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक Political enthusiast शुभम कराड यांनी आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात विक्रम पाचपुते म्हणतात की आपण अनलॉग पनीरचा मुद्दा विधीमंडळात सादर केला होता.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल होते. आणि यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तुकाराम मुंढे यांची निवड केली. मी या संदर्भात एक किस्सा सांगेन की १९ मे चा हा किस्सा आहे. मुख्यमंत्री सहायता संदर्भात कोणतीही पत्रे असली तर मी दर मंगळवारी मुंबईला जातो. मी प्री कॅबिनेट मीटींग पूर्वी जात असतो. त्या दिवशीही मी प्री- कॅबिनेट मीटींग वेळी पोहचलो. जनरली प्री-कॅबिनेट मु्ख्यमंत्री येत नाहीत, मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री आत लवकर येऊन बसले होते. त्यावेळी मी समाधान औताडे यांच्याशी गप्पा मारत उभा होतो. त्यावेळी आतून मुख्यमंत्र्यांना निरोप आला की बाहेर जेवढे आमदार असतील त्यांना आत बोलवा. मुख्यमंत्र्यांनी मला विचारले अरे काय काम ? मी मुख्यमंत्री सहायता निधी संदर्भात पत्र द्यायला आल्याचे सांगितले. मी त्यांची सही घेतली, तेवढ्यात तुकाराम मुंढे तेथून बाहेर गेले…

त्यांची मानसिकता नव्हती

त्यानंतर आमदार महेश शिंदे आले. मी म्हणालो साहेब यांनी एफडीएच्या कलर संदर्भात चांगला प्रश्न मांडला आहे. आणि तेवढ्यात मुख्यमंत्री वळून म्हणाले हे डिपार्टमेंट मी आता नीटच करतो…असे सांगत विक्रमसिंह पाचपुते पुढे म्हणाले की याला साक्षीदार आमदार महेश शिंदे, समाधान औताडे आहेत. आणि संध्याकाळी तुकाराम मुंढे यांची ऑर्डर पडली. त्यारात्री आपण त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याशी बोललो. परंतू त्यांची मानसिकता नव्हती. हे पद दोन पद स्टेप डाऊन आहे. मलाही काही कल्पना नव्हती, पदाचा काय नेमका क्रायटेरिया असतो. आपण त्यांना सांगितले की या पदावरुन तुमच्याकडून जनतेच्या चांगल्या अपेक्षा आहेत, शेवटी निर्णय तुमचा आहे, असेही आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले.

येथे पाहा पोस्ट –

Follow Us
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू
लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची...
Sanjay Raut : लोक रस्त्यावर उतरले तर..; तुम्हाला पळवून पळवून मारतील, राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा