AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोगावले यांना पक्ष प्रतोद कसे केले ?, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मॅरेथॉन सुनावणी सुरु झाली आहे. या सुनावणी नंतर शिवसेना पक्षआणि निवडणूक चिन्ह कोणाचे याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तवाद केला आहे.

गोगावले यांना पक्ष प्रतोद कसे केले ?, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद
eknath shinde and uddhav thackeray
| Updated on: Aug 18, 2026 | 4:11 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे या शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गेल्या आठवड्यापासून सुनावणी सुरु आहे. आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला आहेत. भरत गोगावले यांना पक्ष प्रतोद कसे केले गेले असा जोरदार युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विधी मंडळ पक्षात फुट पडलेली आहे. राजकीय पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही असाही युक्तीवाद केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने कोणत्या आधारे घटनेवर भाष्य केले असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. घटना योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाला हक्क नाही असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. साल २०१८ च्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे नेते आमदार आणि मंत्री झाले आणि ते आता घटनेवर प्रश्न करत आहेत असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. राजकीय पक्षात पक्षप्रमुखालाच महत्व असते. पक्ष प्रमुखाकडे संख्या कमी असली तर पक्ष प्रमुखालाच सर्वाधिकार असतात असेही कपिल सिब्बल यांनी यावेळी युक्तीवादात सांगितले. भरत गोगावले हे नेमके कोणत्या पक्षाचे पक्षप्रतोद होते ?. १९९९ च्या घटनेनुसार पक्ष प्रमुख हे पदच अस्तित्वात नव्हते असाही सवाल यावेळी करण्यात आला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर