LPG Booking : सिलेंडर डिलिव्हरी घेण्यापूर्वीच ही चूक करणे पडू शकते अत्यंत महागात, गॅस कंपन्यांचा मोठा इशारा, थेट..

LPG Booking : इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली. यादरम्यान गॅस सिलेंडर वितरणाच्या नियमात काही बदल करण्यात आली आहेत. दरम्यानच आता ग्राहकांना मोठा इशारा गॅस कंपन्यांनी दिला आहे.

LPG Booking : सिलेंडर डिलिव्हरी घेण्यापूर्वीच ही चूक करणे पडू शकते अत्यंत महागात, गॅस कंपन्यांचा मोठा इशारा, थेट..
LPG gas
| Updated on: May 11, 2026 | 2:48 PM

एलपीजी गॅस सिलेंडरच्या नियमात काही बदल करण्यात आलीत. एलपीजी सिलेंडरच्या फसव्या वितरणांना रोखण्यासाठी आता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) अनिवार्य करण्यात आला आहे. 100 टक्के वितरण त्याच माध्यमातून केले जाईल. त्यामागील महत्वाच्या उद्देश हा आहे की, सिलेंडर योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवणे आणि ते पोहोचले की नाही याची माहिती घेणे. ज्यामुळे सिलेंडरचा काळाबाजार रोखला जाऊ शकतो. मात्र, आता याचा उलट फटका बसताना दिसत आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी त्याला आता शस्त्र म्हणून वापरण्यास सुरूवात केली. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, एचपी गॅस, इंडेन गॅस आणि भारत गॅस यांच्याकडून मूळ डीएसी कसा ओळखायचा आणि शेअर नक्की कधी करायचा याबाबत सूचना जारी केली आहे.

एचपी गॅसकडून सोशल मीडिया एक्सवर खास ग्राहकांना इशारा देत पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये एचपी गॅसने म्हटले की, एलपीजी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवणारे खोटे कॉलर, बुकिंग कन्फर्मेशन, केवायसी अपडेट आणि सिलेंडरची लवकर डिलिव्हरी मिळवण्याकरिता डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करण्यास सांगतात.

अशावेळी आपण तात्काळ त्यांना हा कोड शेअर करतो. मात्र, तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. ओटीपी देखील खोट्या डिलिव्हरी कन्फर्मेशनलामुळे आर्थिक फसवणुक होऊ शकते. अशावेळी तुम्ही हे कसे टाळता येईल. याकडे लक्ष द्या. फसव्या कॉलपासून सावध राहा. एचपीसीएल तुम्हाला कॉलवर तुमचा ओटीपी कधीही विचारणार नाही. कोणतीही गॅस कंपनी तुम्हाला फोन करून तुमचा ओटीपी विचारत नाही.

सिलेंडर तुमच्या दारात पोहोचेपर्यंत तुमचा डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड कधीही शेअर करू नका. सिलेंडर नाही तर ओटीपी नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. गॅस सिलेंडर कंपनीतून बोलत असल्याचे भासवून ग्राहकांची मोठ्या संख्येने फसवणूक होत असल्याने निर्देशनास येत आहे. सर्रासपणे ग्राहकांचे ओटीपी विचारले जात आहेत. यादरम्यानच आता थेट ग्राहकांना मोठा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून देशात एलपीजी गॅसची मोठी समस्या आहे. त्यामध्येच आता हा इशारा ग्राहकांना देण्यात आला.

Follow Us