AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात हाहाकार! गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम, मोठ्या संख्येने कनेक्शन कापले जाणार, या ग्राहकांचे अनुदानही थेट बंद..

LPG New Rule : इराण अमेरिका युद्धात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. होर्मुज खाडी ठप्प आहे. भारतातही एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला. यादरम्यानच तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरबाबत अत्यंत मोठा निर्णय घेतला.

भारतात हाहाकार! गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम, मोठ्या संख्येने कनेक्शन कापले जाणार, या ग्राहकांचे अनुदानही थेट बंद..
LPG New Rule
| Updated on: May 11, 2026 | 11:19 AM
Share

इराण अमेरिका युद्धात एलपीजी गॅसची मोठी समस्या निर्माण झाली. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनही स्थिती आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्चे तेल आणि एलपीजीची वाहतूक ठप्प आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. त्यामध्येच आता काही नियमात बदल करण्यात आला. ज्यांचे वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे, अशा ग्राहकांना एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की, घरगुती सिलेंडर अधिक पैसे देऊन खरेदी करावे लागणार आहे. तेल कंपन्यांनी देशभरातील दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांची माहिती संकलित केली आहे. याबाबत त्यांना मेसेजही पाठवला जाईल. एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यादरम्यान तेल कंपन्यांकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत.

यासोबतच अजून एक मोठा दणका देण्यात आलाय. याव्यतिरिक्त, मृत आणि बनावट खातेधारकांना ओळखले जात आहे. त्यांची चाैकशी करून त्यांचे कनेक्शन्स कायमस्वरूपी बंद केली जात आहेत. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी अनुदानात पारदर्शकता आणण्यासाठी ही मोहिम सुरू केली. उच्च उत्पन्न गट आणि मृत ग्राहकांच्या एलपीजी गॅस जोडण्यांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे फक्त पात्र आणि या नियमात बसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान मिळणार आहे.

सरकारी नियमांनुसार, ज्या ग्राहकांचे वार्षिक एकूण करपात्र उत्पन्न ₹10 लाखांपेक्षा जास्त आहे, ते उच्च उत्पन्न गटात (HIG) येतात, त्यांना गॅससाठी अनुदान मिळू शकणार नाही. आता या ग्राहकांचा शोध हा घेतला जात आहे. तेल विपणन कंपन्या आयकर विभागाच्या (CBDT) डेटाबेसद्वारे ग्राहकांच्या तपशिलाची पडताळणी करत आहेत. तशी मोहिमच त्यांनी हाती घेतली.

यापूर्वी अनेक ग्राहक 10 लाखांपेक्षाही अधिक उत्पन्न असतानाही सवलतीचा फायदा घेत. मात्र, आता याला आळा बसणार आहे. अशा ग्राहकांचा शोध हा सुरू आहे. देशात एलपीजी गॅसची मोठी समस्या असतानाच दुसरीकडे तेल कंपन्यांकडून मोठी पाऊले उचलली जात आहेत. कंपन्या ग्राहकांना ऑनलाइन लिंक पाठवून याची मागणी करत आहेत. मृत कनेक्शन धारकांच्या कुटुंबीयांना कनेक्शन एकतर त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर हस्तांतरित करण्याचा किंवा ते बंद करण्याचा पर्याय दिला जात आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?