AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे सल्ले नाहीत, नाकर्तेपणाचीच...

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे सल्ले नाहीत, नाकर्तेपणाचीच…

| Updated on: May 11, 2026 | 12:30 PM
Share

इराण-इस्त्राईलमधील तणावाचा जागतिक परिणाम पहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

इराण-इस्त्राईलमधील तणावाचा जागतिक परिणाम पहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सोन्याची खरेदी टाळावी, परदेश दौरे कमी करावेत आणि पेट्रोलचा वापर मर्यादित ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कंपन्यांनी शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे पेट्रोल वगैरे ऊर्जा स्त्रोतांची बचत होईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर इतर अनेक नेत्यांनी मत मांडले.

या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, “सरकारकडून दिले जाणारे हे सल्ले नसून गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अपयशाचे संकेत आहेत. ही नाकर्तेपणाची चिन्हे आहेत. देशातील परिस्थिती अशी झाली आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावे आणि कशावर खर्च कमी करावा याबाबत सूचना द्याव्या लागत आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.

Published on: May 11, 2026 12:30 PM
Follow Us