Anjali Damania | जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; पंतप्रधान मोदींच्या इंधन बचत आवाहनावर अंजली दमानिया आक्रमक
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतावरही होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि परकीय चलन जपण्याचे आवाहन केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्यासह पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला.
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतावरही होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि परकीय चलन जपण्याचे आवाहन केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर मर्यादित ठेवण्यासह पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला. त्यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे, कार पूलिंगला प्राधान्य देण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. तसेच खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवण्यासह परदेश दौरे कमी करण्याचाही सल्ला दिला. “कच्च्या तेलाची बचत करणे ही काळाची गरज आहे,” असेही मोदी यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. “मोदींनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःही त्याचे पालन करावे. मोदी आणि त्यांचा पक्ष काय करतोय?, याचाही विचार झाला पाहिजे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच “मोदी चार्टर्ड फ्लाइटने परदेश दौरे करतात आणि नियम फक्त जनतेसाठीच आहेत, हे पाहून दुःख होतं,” असेही दमानिया म्हणाल्या.
यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत, “अंजली दमानिया या उच्च श्रेणीतील विचारवंत आहेत. त्यांच्याशी आमची बरोबरी होऊ शकत नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on: May 11, 2026 01:10 PM
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...

