
भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा डंका सध्या संपूर्ण जगभरात वाजत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चा नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्या रिपोर्टमधून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, सध्या जगभरातील अनेक प्रमुख देशांसाठी गुंतवणूक करण्यासाठी भारत एक ‘हॉटस्पॉट’ बनलं आहे. आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत जेवढी काही परदेशी गुंतवणूक झाली आहे, त्यातील जवळपास 33 टक्के गुंतवणूक म्हणजे 100 रुपयांमधील 33 रुपये गुंतवणूक ही केवळ दोनच देशांनी केली आहे, भारतामध्ये ज्या देशांनी गुंतवणूक केली, त्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर तर सिंगापूर दुसर्या क्रमांकावर आहे.
अमेरिका आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी मिळून भारतामध्ये एकूण गुंतवणुकीपैकी 33 टक्के गुंतवणूक केली आहे. बुधवारी आरबीआयकडून ‘सर्वे ऑफ फॉरेन लायबिलिटी अँड असेट’ आर्थिक वर्ष 2024-25 सादर करण्यात आला आहे, या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार भारतामध्ये परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका आणि सिंगापूरने भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात होणारी परदेशी गुतंवणूक वाढून 68.75 लाख कोटी रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 61.88 लाख कोटी रुपये एवढा होता, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, भारतामध्ये होणार्या परदेशी गुंतवणुकीमध्ये 11.1 टक्के एवढी वाढ झाली आहे. यातील एकूण 20 टक्के गुंतवणूक ही एकट्या अमेरिकेची आहे. तर दुसऱ्या नंबरला सिंगापूरचा नंबर लागतो, सिंगापूरने भारतात एकूण गुंतवणुकीपैकी 14.3 टक्के गुंतवणूक केली आहे. त्यानंतर मॉरिशिशचा नंबर लागतो, मॉरिशसने भारतात 13.3 टक्के गुंतवणूक केली आहे तर ब्रिटनने 11.2 टक्के गुंतवणूक केली आहे.
एकीकडे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, मात्र दुसरीकडे गुंतवणुकीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेनं भारतामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिका हा भारतामध्ये जगातील सर्वाधिक गुतंवणूक करणारा देश ठरला आहे.