दिल्ली विमानतळाच्या तांत्रिक बिघाडाबाबत धक्कादाक खुलासा, मोठी खळबळ, अगोदरच…

विमानतळाच्या तांत्रिक संकटामुळे भारताच्या जुन्या हवाई नेव्हिगेशन प्रणालीबद्दल नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स गिल्डने मोठा दावा केल्याचे बघायला मिळतंय.

दिल्ली विमानतळाच्या तांत्रिक बिघाडाबाबत धक्कादाक खुलासा, मोठी खळबळ, अगोदरच...
elhi Indira Gandhi International Airport
| Updated on: Nov 09, 2025 | 8:41 AM

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक दिल्लीतील आहे. मात्र, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI) एअर कंडिशनिंग ऑटोमेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी आणि शुक्रवारी वाहतूक विस्कळीत झाली. यानंतर अनेक विमाने रद्द करण्याची वेळ आली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगलाच संताप बघायला मिळाला. कित्येक तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. या गडबडीमुळे जवळपास 500 विमाने उशिराने सुरू होतील तर 100 हून अधिक विमाने रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आणि प्रवाशांना झालेला मनस्ताप हा तर वेगळाच. विमानाने प्रवास लवकर आणि सोयीस्कर होत असल्याने लोक वेळ वाचवण्यासाठी विमानाने जाण्याचे नियोजन करतात. मात्र, गुरुवारी संध्याकाळी आणि शुक्रवारी दिल्लीच्या विमानतळावरून प्रवास करणाऱ्याचे नियोजन ढासळून गेले.

या तांत्रिक संकटामुळे भारताच्या जुन्या हवाई नेव्हिगेशन प्रणालीबद्दल नवीन प्रश्न उपस्थित होत आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स गिल्ड (एटीसी गिल्ड) चा दावा आहे की, त्यांनी काही महिन्यांपूर्वी ऑटोमेशनमधील त्रुटींबद्दल इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. सध्या याबाबतची चाैकशी सुरू असल्याची माहिती मिळतंय.

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) नुसार, ऑटोमेशन आणि मेसेज स्विचिंग सिस्टममध्ये बिघाड झाला. ही प्रणाली उड्डाण डेटावर प्रक्रिया करते, रडार फीड्स एकत्र करते आणि विविध हवाई वाहतूक नियंत्रण युनिट्समध्ये समन्वय सुनिश्चित करते. तिच्यामध्येच मोठा बिघाड झाला आणि जवळपास वेळापत्रक उशिराने सुरू होते. हेच नाही तर जास्त विमाने रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

AMSS मध्ये झालेल्या बिघाडानंतर हवाई वाहतूक नियंत्रकांना मॅन्युअल समन्वय मोडमध्ये काम करण्याची वेळ आली. ज्यामुळे विमानांना उड्डाण करण्यास आणि उतरण्यास उशिर होत होता. प्रत्येक गोष्ट त्यांना समन्वय साधून करावी लागत होती आणि त्यामध्ये मोठा वेळही जात होता. एकही चूक भयंकर ठरू शकली असती. दिल्ली विमान तळावर लॅन्ड होणाऱ्या अनेक विमानांना मुंबईसह इतर विमान तळांवर लॅंन्ड करण्यात आले.