AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगापूरला जाणाऱ्या 200 प्रवाशांना अचानक दिल्ली विमानतळावर उतरवले, भीतीचे वातावरण, विमानात…

दिल्ली विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवण्याची धक्कादायक घटना पुढे आलीये. या प्रवाशांना अगोदर तब्बल दोन तास विमानात बसून ठेवण्यात आले आणि मग उतरवले. आता त्याचे कारणही पुढे आलंय.

सिंगापूरला जाणाऱ्या 200 प्रवाशांना अचानक दिल्ली विमानतळावर उतरवले, भीतीचे वातावरण, विमानात...
Air India
| Updated on: Sep 11, 2025 | 9:37 AM
Share

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता सातत्याने एअर इंडियाच्या विमानांमधील बिघाडाबाबत बातम्या येत आहेत. काही दिवसांपूर्वीच चेन्नई विमानतळावर एका एअर इंडियाच्या विमानाची आपत्कालीन लॅडिंग करण्यात आली. अहमदाबादच्या विमान अपघातात फक्त एकच प्रवासी वाचला बाकी सर्व प्रवाशांचा जीव या अपघातात गेला. आता नुकताच एक अतिशय धक्कादायक माहिती ही दिल्लीहून सिंगापूरला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाबद्दल येत आहे.

एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवले खाली 

दिल्ली विमानतळावर सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातून 200 हून अधिक प्रवाशांना उतरवण्यात आले. तब्बल दोन तास हे प्रवासी विमानात बसले होते. मात्र, त्यांना परत विमानातून उतरवण्यात आले. नुकताच मिळालेल्या रिपोर्टनुसार, एअर इंडियाचे हे विमान दिल्लीहून सिंगापूरला निघाले होते. विमानातील सर्व यात्री विमानात आपआपल्या सीटवर बसले देखील होते. मात्र, विमानातून खाली उतरण्याची विनंती त्यांना करण्यात आली.

तब्बल दोन तास प्रवासी विमानात बसून 

एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. एअर इंडियाचे विमान AI2380 रात्री 11 वाजता दिल्ली विमानतळावरून निघणार होते. परंतु ते उशिराने उड्डाण करण्यात आले. प्रवासी तब्बल दोन तास ताडकळत बसले होते. अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्याने शेवटी प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. याबद्दलची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आलीये. एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एअर कंडिशनिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने उड्डाणास उशीर 

विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टीम काम करत नव्हती. हेच नाही तर विमानातून लाईट देखील जात येत होती. सुमारे दोन तास विमानात बसल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीकडे नेण्यात आले. अहमदाबादमधील विमानात देखील अपघाताच्या काही वेळ अगोदर प्रवाश्यांनी कुलिंग होत नसल्याचा दावा केला होता. आता परत एकदा दिल्लीहून सिंगापूरच्या निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात देखील बिघाड झाला.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.