नवरा -बायको घर भाड्यानं पाहण्यासाठी जायचे; फक्त बोलायचे हे 4 शब्द, ते निघून जाताच घरमालक ढसाढसा रडायचा, पोलीसही हादरले

एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली असून, खरा प्रकार लक्षात येताच पोलीसही हादरले आहेत.

नवरा -बायको घर भाड्यानं पाहण्यासाठी जायचे; फक्त बोलायचे हे 4 शब्द, ते निघून जाताच घरमालक ढसाढसा रडायचा, पोलीसही हादरले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2025 | 3:41 PM

उत्तर प्रदेशच्या बागपतमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे, इथे पती-पत्नी रूम भाड्यानं पाहाण्यासाठी जात असत, जेव्हा त्या घराचा मालक त्यांना घरामध्ये बोलावायचा तेव्हा ते हसत हसत म्हणायचे की आम्हाला एक चांगल घर भाड्यानं हवं आहे. त्यानंतर जेव्हा थोड्यावेळात ते घरातून बाहेर पडायचे तेव्हा मालकाची अवस्था वाईट व्हायची, त्याला प्रचंड धक्का बसलेला असायचा जाणून घेऊयात नेमकं काय आहे प्रकरण?

ही घटना बागपतमधील नेहरू रोड स्थिती एका घरामध्ये घडली आहे. इथे एका घरात भरदिवसा घुसून दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा त्या घरात एकटीच एक महिला होती. त्याचवेळी एक दाम्पत्य घर भाड्यानं घेण्याच्या बाहाण्यानं या महिलेच्या घरात शिरलं, आणि या महिलेच्या घरात चोरी केली तिचे दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला, शकुंतला जैन असं या महिलेचं नाव आहे.

शकुंतला जैन यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ही घटना घडली तेव्हा मी घराच एकटीच होते. माझा पती जगदीश जैन यांचा 15 वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. माझा मुलगा प्रवीण हा नोकरीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये राहातो.शुक्रवारी दुपारी मी माझ्या घरात आराम करत होते. यावेळी एक महिला आणि पुरुषाने माझं दार वाजवलं, आणि म्हटलं की आम्हाला भाड्यानं घर हवं आहे.

मी विचार केला की यांना खरच गरज असेल, त्यामुळे मी दरवाजा उघडला. त्यानंतर त्या दोघांनी घर पाहाण्याचं नाटक केलं, आणि त्यानंतर अचानक माझ्यावर हल्ला केला. ते माझ्या अंगावर असलेले सर्व सोन्याचे दागिने घेऊन पळून गेले असं जैन यांनी सांगितलं, तसेच त्यांनी मला धमकी देखील दिली, आरडा-ओरड करू नको, पोलिसांमध्ये तक्रार करू नको नाहीतर आम्ही तुला मारून टाकू असं त्यांनी म्हटल्याचं शकुंतला यांनी सांगितलं.

ते घरातून निघाल्यानंतर मी घराच्या बाहेर आले, आरडा-ओरड केली, तेव्हा शेजारी मदतीसाठी आले, मी त्यांना घडलेली घटना सांगितली, त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, ती महिला आणि तिच्यासोबत असलेला पुरुष सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, आरोपीचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं अशी माहिती शकुंतला जैन यांनी दिली आहे. दरम्यान या दोन आरोपींनी अशा पद्धतीनं इतरही काही ठिकाणी चोरी केली असावी असा पोलिसांना संशय आहे.