AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा मित्राच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या वर्तुळात खळबळ

hyderabad shocking : हैदराबादमध्ये एका प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा मित्राच्या घरी आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या वर्तुळात खळबळ
| Updated on: Jul 20, 2026 | 2:56 PM
Share

हैदराबादच्या एका प्रशिक्षाणार्थी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर रविवारी सायंकाळी एर्रागड्डा येथील जयंत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. परंतु या घटनेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय कृष्ण रेड्डी हे रविवारी सायंकाळी मोती नगर भागात एका मित्राच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी मित्राच्या घरी विष प्यायल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमीचे अधिकारी जयंत रुग्णालयात भेटीला पोहोचले आहेत. त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेऊन रेड्डी यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली आहे. याबाबत अद्याप राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

तत्पूर्वी, पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांकडून सर्व बाबींचा तपास केला जात आहेच. आता पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल आणि पुराव्याच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यांनी खरंच विष प्यायला होतं का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पोलीस (Police) आणि राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून लवकरच अधिकृत भाष्य केलं जाईल, त्यानंतर या प्रकरणाची वस्तूस्थिती समोर येईल.

नेमकं काय घडलं?

एका महिला ट्रेनी आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी कोणत्याही परवानगीशिवाय प्रायव्हेट व्हिडिओ केल्याचाही गंभीर आरोप केला आहे. परंतु उदय कृष्ण रेड्डी यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. रिपोर्टनुसार, गंभीर आरोपानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा.

मोठी बातमी! अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात, कॉक्रोच जनता पार्टीचा मोठा दावा

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!.

CJP Protest : पोलिसांनी ट्रकमधून खेचलं, लाथा घातल्या, आंदोलकांना थेट धक्काबुक्की; दिल्लीत वातावरण चिघळलं!

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यासह या तीन मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन; तिसरी मागणी काय?

15 सोन्याचे कलश, 45 किलो चांदी… हवेलीत सापडला अचानक खजिना, नेमकं कुठे घडलं?.

15 सोन्याचे कलश, 45 किलो चांदी… हवेलीत सापडला अचानक खजिना, नेमकं कुठे घडलं?