AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS अधिकारी घडवणाऱ्या अकॅडमीच्या डायरेक्टरसोबत धक्कादायक घडलं, 5 स्टार हॉटेलमधून फ्लॅटवर नेलं आणि तिथे…

सेमिनार आणि दुसऱ्या सेंटरचं प्रियांकने, शुभ्रा यांना आमिष दाखवलं. बिझनेस व्हिजिट आहे, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन शुभ्रा भोपाळला आल्या. त्या अलगद प्रियांक शर्माने रचलेल्या जाळ्यात येऊन अडकल्या.

IAS अधिकारी घडवणाऱ्या अकॅडमीच्या डायरेक्टरसोबत धक्कादायक घडलं, 5 स्टार हॉटेलमधून फ्लॅटवर नेलं आणि तिथे...
Priyank Sharma- Shubhra Ranjan
| Updated on: May 05, 2026 | 8:11 AM
Share

IAS अधिकारी घडवणाऱ्या दिल्ली स्थित IAS कोचिंग अकॅडमीच्या संचालकाची फसवणूक केल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हे सर्व घडलं. IAS कोचिंग अकॅडमीच्या डायरेक्टरची फसवणूक करणारा कोणी अनोळखी नाहीय. त्यांच्याच वर्तुळातील ओळखीचा व्यक्ती आहे. प्रियांक शर्मा असं आरोपीचं नाव आहे. तो दिल्लीत स्थित कोचिंग अकॅडमीची भोपाळमध्ये फ्रेंचायजी चालवतो. दिल्लीत शुभ्रा रंजन IAS अकादमी आहे. प्रियांक शर्माने या अकॅडमीच्या डायरेक्टर शुभ्रां रंजन यांचा विश्वास संपादन केला. त्यांना दिल्लीवरुन भोपाळला बोलवून घेतलं. त्यासाठी त्याने अकादमीच्या विस्तारांचं कारण दिलं. सेमिनार आणि दुसऱ्या सेंटरचं प्रियांकने, शुभ्रा यांना आमिष दाखवलं. बिझनेस व्हिजिट आहे, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेऊन शुभ्रा भोपाळला आल्या. त्या अलगद प्रियांक शर्माने रचलेल्या जाळ्यात येऊन अडकल्या.

आरोपी प्रियांकने शुभ्रा यांना चार तास बंधक बनवून ठेवलं. त्यांच्या कपाळावर बंदूक रोखून 1.89 कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करायला लावले. शुभ्रा रंजन भोपाळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. बुधवारी दुपारी 2 ते 3 च्या सुमारास प्रियांकने शुभ्रा यांना हॉटेलमधून पिक केलं. त्यांना तो बागसिवानिया भागातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तक्रारदार शुभ्रा यांच्यानुसार एक सशस्त्र गुन्हेगार आधीपासूनच दबा धरुन बसलेला. पीडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बंधक बनवून ठेवले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 1.89 कोटी रुपये जनकशीला सोसायटी आणि आरएस एन्टरप्राईजेस या बँक खात्यात ऑनलाइन जमा करायला लावले.

याच अकादमीत UPSC परीक्षेची तयारी केलेली

ज्या फ्लॅटमध्ये गुन्हा घडला तो एकदिवस आधीच भाड्यावर देण्यात आला होता. दातिया, रेवा आणि अन्य ठिकाणहून गुन्हेगार आले होते. पिस्तुल आणि देश बनावटीचा कट्टा पीडितांना धमकावण्यासाठी वापरण्यात आला, असं पोलिसांनी सांगितलं. शुभ्रा जवळपास चार तास त्या रुममध्ये होत्या. पिस्तुल त्यांच्या डोक्यावर रोखण्यात आली होती. शुभ्रा रंजन यांच्याकडे भरपूर पैसा आहे असं प्रियांकच मत होतं. म्हणून त्याने कारस्थान रचून हा गुन्हा केला. आरोपी निवृत्त BHEL अधिकाऱ्याचा मुलगा असून आधी तो दिल्लीला रहायचा. प्रियांकने याच अकादमीत UPSC परीक्षेची तयारी केली होती. त्याला या अकदामीबद्दल सर्वकाही माहित होतं. त्याच आधारावर त्याने तक्रारदार शुभ्रा यांचा विश्वास संपादन केला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी