IAS पूजा सिंघलांच्या सीएने सांगितली मोडस ऑपरेंडी, दर महिन्याला 30 कोटी रुपये ब्लॅकचे होत होते व्हाईट ?

ईडीच्या अधिकाऱ्यांना सीए सुमनकुमार याने महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत ईडीकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक महिन्यात 30 कोटी रुपये व्हाईट करण्यात येत होते,

IAS पूजा सिंघलांच्या सीएने सांगितली मोडस ऑपरेंडी, दर महिन्याला 30 कोटी रुपये ब्लॅकचे होत होते व्हाईट ?
IAS Pooja and money
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 10:09 PM

रांची कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात (money laundering), झारखंडात वरिष्ठ आयएएस अधिकारी  आणि खाण विभागाच्या सचिव पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमारच्या ईडीने (ED)केलेल्या चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली आहे. ईडीच्या टीमने सुमनकुमार याच्या चौकशीसाठी 11 मेपर्यंत ईडीला त्याची कोठडी मिळाली आहे. सुमन कुमार याच्या चौकशीनंतर ईडी या प्रकरणात पूजा सिंघल आणि त्यांचे पती अभिषेक सिंघल यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अभिषेक झा यांची 12 तास चौकशी केली असल्याची माहिती आहे. सुमन कुमार यांनी दिलेल्या खळबळजनक माहितीनंतर आता पूजा सिंघल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे, त्यासाठीचे समन्सही पाठवण्यात आले आहे.

दरमहा ३० कोटी होत होते व्हाईटसीए

ईडीच्या अधिकाऱ्यांना सीए सुमनकुमार याने महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत ईडीकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक महिन्यात 30 कोटी रुपये व्हाईट करण्यात येत होते, अशी माहिती सुमनकुमार यााने ईडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. तसेच अधिकृतरित्या पूजा सिंघल यांच्या बँकेच्या वैयक्तिक खात्यातून 16.57 लाख रुपये सीए सुमन कुमार याच्या खात्यात जमा केल्याचीही माहिती मिळाली आहे. हे पैसे खात्यात पाठवल्याचा उल्लेख ईडीने कोर्टात केला होता. त्यानंतर सुमन कुमार यांची कोठडी ईडीला देण्यात आली.

अभिषेक झा यांची 12 तास चौकशी, 60 प्रश्न

ईडीच्या अधिकाऱअयांनी रविवारी अभिषेक झा आणि सीए सुमन कुमार यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यापूर्वी दोघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांना 60 पेक्षा जास्त प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारल्याची माहिती आहे. रविवारी रात्री ९च्या सुमारास अभिषेक झा ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. तर सुमन कुमार यांची पुढचे पाच दिवस ईडी चौकशी करणार आहे.

ईडीने केलेल्या छापेमारीत सापडली होती 19 कोटींची कॅश

दोन दिवसांपूर्वी ईडीने केलेल्या छापेमारीत पूजा सिंघल यांच्या सीएच्या घरी 19 कोटींची कॅश जप्त करण्यात आली होती तसेच 150 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रेही ईडीला मिळाली होती. एकाचवेळी देशात 25 ठिकाणी या प्रकरणात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सीए सुमनकुमार यांना अटक करण्यात आली आहे.