IBPS Clerk 2019 recruitment : 12074 पदांसाठी नॉटीफिकेशन, अर्ज कसा कराल?

इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) बँकेतील (Institute of Banking Personnel Selection) क्लर्क पदासाठी भरती (IBPS Clerk 2019 recruitment online) सुरु केली आहे.

IBPS Clerk 2019 recruitment : 12074 पदांसाठी नॉटीफिकेशन, अर्ज कसा कराल?

IBPS Clerk 2019 recruitment online : इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) बँकेतील (Institute of Banking Personnel Selection) क्लर्क पदासाठी भरती (IBPS Clerk 2019 recruitment online) सुरु केली आहे. या भरतीबाबत अधिसूचना करण्यात आली. यानुसार यात देशभरातील 17 सरकारी बँकांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी 17 सप्टेंबर 2019 ते 9 ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करता येईल. जवळपास 12 हजार 074 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

बँकेतील क्लर्क पदासाठी होणारी निवड प्रक्रिया (IBPS Clerk Recruitment 2019) ही तीन टप्प्यांमध्ये असेल. यासाठी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरल्यानंतर पुढील संधी दिली जाईल.

‘या’ बँकांमध्ये भरती होणार

  1. अलाहाबाद बँक
  2. आंध्रा बँक
  3. बँक ऑफ बडोदा
  4. बँक ऑफ इंडिया
  5. बँक ऑफ महाराष्ट्र
  6. कॅनरा बँक
  7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  8. कॉर्पोरेशन बँक
  9. इंडियन बँक
  10. इंडियन ओवरसीज बँक
  11. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  12. पंजाब नॅशनल बँक
  13. पंजाब अँड सिंध बँक
  14. सिंडिकेट बँक
  15. यूको बँक
  16. युनियन बँक ऑफ इंडिया
  17. युनायटेड बँक ऑफ इंडिया

अर्ज करण्याची प्रक्रिया

आयबीपीएस या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदरावांना ऑनलाईन (IBPS Clerk Recruitment 2019) माध्यमाद्वारे अर्ज करता येणार आहे. यासाठी ibps.in या वेबसाईटवर उमेदवारांनी भेट द्या.

महत्त्वाच्या तारखा

 • ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात – 17 सप्टेंबर 2019
 • शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2019
 • पूर्व-परीक्षा प्रशिक्षण Pre-Exam Training (PET) – 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत
 • ऑनलाईन परीक्षांची तारीख – 7, 8, 14 आणि 21 डिसेंबर 2019
 • निकाल – डिसेंबर 2019 किंवा जानेवारी 2020 या दरम्यान
 • मुख्य परीक्षा – 19 जानेवारी 2020

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना पदवीधर असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्याशाखेतून पदवीधर असल्यास आपण यात सहभागी होऊ शकता.

वयोमर्यादा

आयबीपीएसद्वारे जारी केलेल्या सूचनेनुसार, बँकामध्ये कर्ल्कपदाच्या नोकरीसाठी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुमचा जन्म 2 सप्टेंबर 1991 च्या पूर्वी झालेला असणे गरजेचे आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *