India Air Defence System : हिज्बुल्लाहसारखे पाकिस्तानने एकाचवेळी हजारो रॉकेट डागले तर भारताची तयारी काय?
India Air Defence System : भारताला चीन आणि पाकिस्तानचा शेजार लाभला आहे. या दोन्ही देशांबरोबर भारताने युद्ध लढलं आहे. हे दोन्ही देश कुरापतखोर स्वभावाचे आहेत. भारताला त्रास देणं, अस्थिर करणं हा त्यांचा अजेंडा असतो. दहशतवाद व अन्य मार्गाने भारतावर या देशांनी अनेकदा वार केला आहे. चीन-पाकिस्तान भरोशाचे शेजारी नाही. उद्या त्यांनी हमास किंवा हिज्बुल्लाह सारखा हल्ला केला, एकाचवेळी हजारो रॉकेट्स डागले तर भारताची तयारी काय आहे? आपण त्यांचा रॉकेट हल्ला परतवून लावण्यासाठी सक्षम आहोत का? आपली तयारी काय आहे? ते जाणून घ्या.

प्रत्येक युद्धाची दोन प्रमुख कारण असतात जमीन आणि धर्म. तलवारी, भाल्यापासून ते आताच्या काळात अत्याधुनिक रॉकेट, रायफलने लढल्या जाणाऱ्या युद्घामागे सुद्धा हेच कारण आहे. रशिया-युक्रेन युद्धामागे जमीन एक प्रमुख कारण आहे. युक्रेन नोटा समूहात सहभागी झाल्यास रणनितीक दृष्टीने रशियाला धोका निर्माण होईल, म्हणून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाचा निर्णय घेतला. युक्रेनमधील रशियासाठी रणनितीक दृष्टीने सोयीची ठरणारी ठिकाणं त्यांनी ताब्यात घेतली. इस्रायल-हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धामागे धर्म आणि प्रादेशिक विस्तार हे प्रमुख कारण आहे. आज 21 व्या शतकात अनेक देशांची विस्ताराची महत्त्वकांक्षा युद्धाला कारण ठरत आहे. उदहारणार्थ चीन. जमीन, धर्माबरोबर 21 व्या शतकात युद्धाच आणखी एक कारण म्हणजे तेल. रासायनिक शस्त्रांच्या नावाखाली अमेरिकेने इराकवर केलेलं आक्रमण हे त्याच एक उदहारण आहे. ...
