Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?

Agni-5 MIRV : चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? असा प्रश्न काही जणांच्या मनात येऊ शकतो. पण अशी मिसाइल बनवणं का गरजेचं आहे? त्यामागे उद्देश काय? तो समजून घ्या.

Agni-5 MIRV : पाकिस्तान-चीन आपल्या शेजारीच, मग त्यासाठी 5 हजार किमी रेंज असलेल्या मिसाइलची गरज काय?
Agni-5 MIRV
Image Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 4:03 PM

या लेखाचं हेडींग वाचून कधी तुमच्या मनात असा प्रश्न येत नाही का, चीन-पाकिस्तान आपल्या शेजारीच आहेत, मग त्यासाठी आपल्याला 5000, 10000 किलोमीटर रेंज असलेली मिसाइल बनवण्याची गरज काय? भारताकडे आज ब्राह्मोस, प्रलय, अग्नि अशी अनेक मिसाइल्स आहेत, जी काही मिनिटात चीन-पाकिस्तानमधील लक्ष्याचा वेध घेऊ शकतात. मग, इतक्या लांब पल्ल्याची, हजोर किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करु शकणाऱ्या क्षेपणास्त्रांची गरज काय?. आपले दोन्ही मुख्य शत्रू आपल्या शेजारीच राहतात. तुम्हाला जरी असा प्रश्न पडत असला तरी अशी मिसाइल का बनवली जातात? त्यामागे काय कारणं आहेत? त्याची गरज का आहे? ते आपण समजून घेऊया. भारताने आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरु केला, तो मूळात चीन-पाकिस्तान पासून असलेला धोका लक्षात घेऊन. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका ही नेहमी शांतताप्रिय देशाची राहिली आहे. स्वातंत्र्यापासूनच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताने स्वत:हून कधीच कुठल्या देशावर हल्ला केलेला नाही. उलट समोरच्या शत्रूने जेव्हा विनाकारण युद्ध पुकारलं, आगळीक केली, तेव्हा भारताने उत्तर दिलय. 1962 पासूनच...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us