AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळ फाटणार… महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पाऊस झोडपणार, IMD कडून अलर्ट जारी

IMD Weather Forecast : गेल्या 24 तासांत उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी झाली. आता उद्या देशाच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आभाळ फाटणार... महाराष्ट्रासह या राज्यांना मुसळधार पाऊस झोडपणार, IMD कडून अलर्ट जारी
IMD India Rain Alert 10th JulyImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2026 | 9:38 PM
Share

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे, त्यामुळे सर्वच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात कमी दाबाचे स्पष्ट क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे उद्या (10 जुलै) पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. खासकरून उत्तराखंडसाठी हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर याशिवाय 10 जुलैसाठी 13 राज्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टही देण्यात आला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये अतिवृष्टी झाली. तसेच पश्चिम बंगालमधील डोंगराळ भाग, तामिळनाडू, कोकण, केरळ आणि त्रिपुरामध्येही मुसळधार पाऊस झाला. केरळ, मराठवाडा, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने वारे आणि वादळी पावसाची नोंद झाली आहे. आता जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हरियाणा आणि चंदीगडमध्येही पावसाचा इशारा

10 जुलैसाठी हरियाणा आणि चंदीगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन, चिखलाचे प्रवाह, सखल भागात पाणी साचणे आणि अचानक पूर येण्याचा धोका असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

10 जुलैला कोणत्या भागात पाऊस कोसळणार?

IMD च्या अंदाजानुसार, 10 जुलै 2026 रोजी देशातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंड सर्वाधिक प्रभावित राहण्याची शक्यता असून, गढवाल, पौडी, चमोली, पिथौरागढ, बागेश्वर, अल्मोडा, चंपावत आणि नैनीताल जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लडचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ईशान्य भारतातही पावसाचा जोर कायम

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश आणि बिहारमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

दिल्लीचे हवामान कसे असेल?

दिल्लीत 10 जुलै रोजी दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सकाळी किंवा दुपारपूर्वी अनेक भागांत हलका पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, किनारी कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथेही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या भागातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?