AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Alert : 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, या राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी

IMD Alert News : भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, 9 मेपर्यंत काश्मीर ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.

IMD Rain Alert : 70-80 किमी वेगाने वादळी वारे वाहणार, या राज्यांना पाऊस झोडपणार; महाराष्ट्रातही अलर्ट जारी
Rain Alert IndiaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 04, 2026 | 10:36 PM
Share

देशातील विविध भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने विविध राज्यांसाठी ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, 9 मेपर्यंत काश्मीर ते दक्षिणेकडील टोक कन्याकुमारीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात विजा कोसळण्याची, वादळी वारे वाहण्याची, गारपीटीची आणि धुळीच्या वादळांची शक्यता आहे. देशाच्या कोणत्या भागात कसे हवामान असेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा इशारा

दिल्ली-एनसीआरमध्ये संपूर्ण आठवडाभर हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. 6 मेपर्यंत हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना होऊ शकते. या काळात 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि विजा पडण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीटही होण्याची शक्यता आहे.

डोंगराळ भागात बर्फवृष्टी

जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या उत्तर-पश्चिमेकडील डोंगराळ राज्यांत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि उंच भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या काळात 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात उत्तराखंडमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये वादळाचा इशारा

पंजाब, हरियाणा आणि चंदीगड येथे 6 मेपर्यंत पावसाची शक्यता आहे. 4 आणि 5 मे रोजी 70 किमी प्रतितास वेगाचे तीव्र वादळ आणि 4 मे रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश मध्ये 3 ते 7 मेदरम्यान वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 4 मे रोजी संपूर्ण राज्यात आणि 5 मे रोजी पूर्व भागात 70 किमी प्रतितास वेगाचे वादळ येण्याची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते.

राजस्थानमध्ये धुळीचे वादळ

राजस्थान मध्ये 4 मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानात 4-7 मे आणि पूर्व राजस्थानात 4-8 मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाचे वारे वाहतील. 4 मे रोजी पूर्व राजस्थानात गारपीट होऊ शकते. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय मध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

बिहार, बंगाल आणि झारखंडमध्ये वादळ

पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथे आठवडाभर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह पावसाची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी