मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार देणार, यासाठी लेबर कार्ड बनवा, ‘ही’ आहे पूर्ण प्रोसेस

कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार देण्याची हमी देण्यात आलीय. यासाठी संबंधित कामगारांना नोंदणी करणं आवश्यक आहे.

मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार देणार, यासाठी लेबर कार्ड बनवा, 'ही' आहे पूर्ण प्रोसेस
जाणून घ्या 1 मे ला ‘कामगार दिवस’ का साजरा केला जातो?
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 2:19 AM

नवी दिल्ली : कामगारांसाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र, अनेक योजना केवळ कागदोपत्री राहतात, तर अनेक योजनांची पूर्ण माहिती कामागारांना मिळतच नाही. यात अशाही काही योजना असतात ज्या कामगारांच्या खूप उपयोगाच्या असतात. अशीच एक योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरु केलीय. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणापासून अगदी लग्नापर्यंतचा सर्व खर्च सरकार देण्याची हमी देण्यात आलीय. यासाठी संबंधित कामगारांना नोंदणी करणं आवश्यक आहे (Important scheme for labours for Children education and marriage).

कामगारांना नोंदणी करण्यासाठी आणि ‘लेबर कार्ड’ बनवण्यासाठी काही निकष आहेत. यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असायला हवी. हे कार्ड फक्त गरीब प्रवर्गातील कामगारांच्या कुटुंबानाच दिलं जातं. या अंतर्गत कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत सुध्दा पुरविली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट http://www.uplabour.gov.in या साईटवर जाऊन अर्ज करावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

  1. कामगार कार्ड बनविण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, ज्याच्या आधारावर कामगार कार्ड बनविता येईल.
  2. कामगार कार्ड बनविण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आधार कार्ड आहे. आधार कार्ड अनिवार्य आहे. याचा उपयोग करुन कामगार कार्ड तयार करता येते.
  3. कोणत्याही कुटुंबात कोणत्याही एकाच व्यक्तीचं कामगार कार्ड बनविण्यात येतं. त्यामुळे तुम्हाला सर्व महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील.
  4. ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करावी लागणारी कागदपत्रं
  5. कामगाराचे स्वतःचे बँक खाते असायला हवे. यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत पाठविली जाईल.
  6. मोबाईल नंबर असायला हवा जेणेकरून या योजनेच्या संदर्भात आपणास काही माहिती दिली जाईल किंवा पैसे जमा झाल्याचा ओटीपी पाठवला जातो.
  7. रेशन कार्ड (शिधा पत्रिका)
  8. मूळ रहिवासी प्रमाणपत्र (रहिवासी दाखला)
  9. पासपोर्ट साईज फोटो आणि कामगार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
  10. ज्या व्यक्तीने एका वर्षात 90 दिवस काम केले तोच या योजनेच्या अंतर्गत नोंदणी करू शकतो.

योजनेतू काय लाभ?

या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक राज्यात मिळत आहे. संबंधित राज्य सरकारांनी त्यासाठी विविध नियमावली बनवल्या आहेत. या नियमानुसारच कामगारांना लेबर कार्डसाठी अर्ज करावा लागतो. कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने कामगारांसाठी मोफत अन्न योजना चालू केली. त्यातही लेबर कार्डचा उपयोग झाला. या कार्डधारकांना 2 रुपये किलो दराने गहू मिळाले.

या योजनेच्या माध्यमातून कामगार आपल्या मुलांच्या शिष्यवृत्ती, प्रसूती दरम्यान होणारा खर्च, शक्ती योजना घरकुल योजना, गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी या कार्डचा फायदा होऊ शकतो. केंद्र किंवा राज्य सरकारच्यावतीने चालवली जाणारी घरकुल योजनेचा फायदाही या कार्ड धारकांना मिळतो. सरकारच्या वतीने कामगारांची एक पूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात सांगितलं आहे की या योजनांचा कोण कोण फायदा घेऊ शकते.

या योजनांचा फायदा कोण घेऊ शकतं?

कारपेंटर, मिस्त्री, रस्ते तयार करणारे कामगार, लोहार, बिल्डिंग कामगार, चौकीदार, विटभट्टीवर काम करणारे कामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, रंगांचे काम करणारे पेंटर, दगड तोडणारे कारागीर इत्यादींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेच्या अंतर्गत कार्ड बनू शकते आणि सरकारी मदतीचा लाभ घेता येऊ शकतो.

हेही वाचा :

8 तास काम नंतर 3 तास आराम, पगारही फुल्ल; जाणून घ्या ‘हा’ नवा नियम

“कामगार कुठले आहेत? महाराष्ट्राच्या कोणत्या भागातले?” जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा

स्थलांतरित मजुरांना आंतरराज्य प्रवासाला बंदी, रोजगारासाठी केंद्राच्या राज्यांना सूचना

व्हिडीओ पाहा :

Important scheme for labours for Children education and marriage

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.