AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Bus Rape Case : धक्कादायक, देशाच्या राजधानीत स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

Delhi Bus Rape Case : देशाची राजधानी महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करणारी घटना घडली आहे. दिल्लीत एका स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार झाला आहे.

Delhi Bus Rape Case : धक्कादायक, देशाच्या राजधानीत स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार
Delhi Bus Rape Case
| Updated on: May 14, 2026 | 11:22 AM
Share

देशाच्या राजधानीत दिल्लीत महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालय. तिथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करुनही हे आरोपी घाबरत नाहीयत हेच दिल्लीच्या घटनेवरुन सिद्ध होतं. राजधानी दिल्लीत एका खासगी स्लीपर बसमध्ये महिलेवर बलात्कार झाला. बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरवर बलात्काराच आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी 12 मे रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. या प्रकरणी तपास सुरु आहे. जिथे ही घटना घडली, ती स्लीपर बस पोलिसांनी जप्त केली आहे.

पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुलं आहेत असं सूत्रांनी सांगितलं. पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली आहे. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर FIR नोंदवण्यात आला. तक्रार, गुन्हा दाखल करुन घेण्याची सर्व प्रोसिजर झाल्यानंतर पोलिसांनी Action घेतली. आरोपींना अटक केली. हा गुन्हा बसच्या आतमध्ये घडला. महिला या बसमधून प्रवास करत होती असं तपासकर्त्यांनी सांगितलं. कुठल्या परिस्थितीत हा गुन्हा झाला तसचं बसचा मार्ग काय होता, ते अद्यापपर्यंत पोलिसांनी सांगितलेलं नाही.

गुन्हा घडला त्यावेळी बस पळत होती का?

सध्या दोन्ही आरोपी ड्रायव्हर आणि कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरु आहे. बसमधून गोळा केलेल्या पुराव्यांची तपासणी सुरु आहे. फॉरेन्सिक आणि मेडिकल रिपोर्ट सुद्धा या प्रकरणात महत्वाचे ठरणार आहेत. तपास अधिकारी भक्कम केस बनवण्यासाठी अजून पुरावे गोळा करत आहेत. त्यासाठी ते घटनाक्रम जुळवत आहेत. गुन्हा घडला त्यावेळी बस पळत होती का? त्याशिवाय दुसरा अन्य कोणी प्रवासी बसमध्ये होता का? याचा पोलीस तपास करतायत. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास पुढे जाईल तशी अजून माहिती मिळेल. पोलिसांनी आरोपींची ओळख अजून जाहीर केलेली नाही.

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल