AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajasthan Crime : धक्कादायक ! राजस्थानमध्ये हुंड्यासाठी पत्नीवर सामूहिक अत्याचार, मग व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकण्याची धमकी

पीडितेचा 2019 मध्ये आरोपीसोबत विवाह झाला होता. आरोपी हरियाणातील पुनहाना येथील रहिवासी आहे. लग्न झाल्यापासून सासरचे लोक महिलेचा हुंड्यासाठी छळ करीत होते. या छळाला कंटाळून पीडिता आपल्या माहेरी निघून गेली होती. मात्र पतीने समजूत काढून पुन्हा तिला सासरी परत आणले. त्यानंतर आपल्या दोन नातेवाईकांना घरी बोलावून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला.

Rajasthan Crime : धक्कादायक ! राजस्थानमध्ये हुंड्यासाठी पत्नीवर सामूहिक अत्याचार, मग व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकण्याची धमकी
लखनऊमध्ये दारुड्या बापाकडून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचारImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 30, 2022 | 4:08 PM
Share

जयपूर : राजस्थानमधील भरतपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दीड लाख रुपये हुंड्यासाठी एका पतीने आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार (GangRape) केल्याची घटना घडली आहे. नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही. या दृष्कृत्याचा व्हिडिओ (Video) बनवून हुंड्याचे पैसे न मिळाल्यास व्हिडिओ यूट्युबवर टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. या दृष्कृत्यात पतीसह त्याच्या दोन नातेवाईकांचा सहभाग आहे. याप्रकरणी कामा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. (In Rajasthan his wife was abused for dowry and threatened to post a video on YouTube)

हुंड्यासाठी पत्नीवर अत्याचार आणि धमकी

पीडितेचा 2019 मध्ये आरोपीसोबत विवाह झाला होता. आरोपी हरियाणातील पुनहाना येथील रहिवासी आहे. लग्न झाल्यापासून सासरचे लोक महिलेचा हुंड्यासाठी छळ करीत होते. या छळाला कंटाळून पीडिता आपल्या माहेरी निघून गेली होती. मात्र पतीने समजूत काढून पुन्हा तिला सासरी परत आणले. त्यानंतर आपल्या दोन नातेवाईकांना घरी बोलावून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचा मोबाईल व्हिडिओ बनवला. तुझे घरचे मला हुंडा देऊ शकत नसल्यामुळे मी हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकून पैसे कमवणार असल्याची धमकी महिलेला दिली. कामा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गु्न्हा दाखल केला आहे. अश्लील व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्याची चर्चा आहे. मात्र सध्या याची पुष्टी होणे बाकी आहे. चौकशीनंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे कामा पोलिस स्टेशनचे प्रभारी दौलत साहू यांनी सांगितले. (In Rajasthan his wife was abused for dowry and threatened to post a video on YouTube)

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात